BAN vs SL 1st Test: कसोटी सामन्यात उष्णतेचा कहर, मॅचदरम्यान कडक उन्हात अंपायर आजारी पडले; पहा पुढे काय घडले

टीव्ही अंपायर जो विल्सन यांनी मैदानावरील इंग्लिश अंपायरची जागा घेतली.

चिटगांग उष्णतेची लाट (Photo Credit: Twitter)

बांग्लादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यतील चिटगांग (Chittagong) येथे सुरु असलेल्या कसोटी समान्यदरम्यान एक विचित्र घटना घडली, जेव्हा पाहिल्य कसोटी सामन्याच्या चौथ्‍या दिवशी उष्नातेमुळे (Heat) खेळ तात्पुरता थांबवावा लागला. या सामन्यात अंपायर रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) यांना आजारपणामुळे मैदान सोडावे लागले. चिटगांगमधील कडक उन्हात केटलबरोने सामन्याच्या 139 व्या षटकाच्या आधी मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. टीव्ही अंपायर जो विल्सन यांनी मैदानावरील इंग्लिश अंपायरची जागा घेतली. ही घटना पहिल्या कसोटी सामन्याच्या 139 व्या षटकाच्या आधी घडली. अंपायर कडक उन्हाचा उन्हाचा सामना करू शकले नाहीत आणि प्रकृती अस्वास्थ्या झाल्यामुळे ते मैदान सोडून बाहेर गेले.

त्याचवेळी ही घटना घडल्यानंतर खेळाडूंनी ड्रिंक ब्रेक घेतला. ड्रिंक्स ब्रेक दरम्यानही असे काही दिसले ज्याबद्दल चाहते सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. ड्रिंक्स ब्रेकची घोषणा होताच खेळाडूंसाठी एक महाकाय छत्री मैदानावर पाठवण्यात आली. खेळाडूंनी छत्रीखाली ड्रिंक्स ब्रेकचा आनंद लुटला. सोशल मीडियावर खेळाडूंच्या मोठ्या छत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. सामन्याबद्दल बोलायचे तर बांगलादेशने पहिल्या डावात 465 धावा केल्या ज्यात मुशफिकर रहीम आणि तमिम इक्बाल यांनी शानदार शतके झळकावली. त्याचवेळी श्रीलंकेचा पहिला डाव 397 धावांवर आटोपला होता. आता चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 2 बाद 39 धावा केल्या आहेत. लंकेचा संघ अजूनही बांगलादेशपेक्षा 29 धावांनी पिछाडीवर आहे. लक्षणीय आहे की बांगलादेशने श्रीलंकेला कसोटी मालिकेत कधीही पराभूत केले नाही आणि चालू मालिकेत मोमिनुल हकच्या नेतृत्वाखाली संघ ही मालिका खंडित करण्याच्या प्रयत्नात असेल.

दुसरीकडे, मुशफिकुर रहीम कसोटी क्रिकेटमध्ये 5,000 धावांचा टप्पा गाठणारा बांगलादेशचा पहिला फलंदाज बनला आहे. मुशफिकुरने चिटगांग येथे त्याच्या डावात विक्रमी पल्ला गाठला. दिवसाचा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा त्याच्या 81व्या कसोटी सामन्यात तो 5,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 15 धावा दूर होता. बांगलादेशने 3 बाद 318 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला व त्यांना 68 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात लसिथ एम्बुल्डेनिया बाद होताच चौथ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला. आता शेवटच्या पाचव्या दिवसाचा खेळ शिल्लक असताना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी सामन्याने अनिर्णित निकालाकडे वाटचाल सुरु केली आहे.