Australia vs Pakistan 1st ODI Live Streaming: ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार हाय व्होल्टेज सामना, इथे जाणून घ्या भारतात कधी, कुठे पाहणार लाइव्ह मॅच
या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या हातात आहे.
Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका 2024 (ODI Series 2024) मधील पहिला सामना आज म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघांमधला हा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सकाळी 9 वाजल्यापासून खेळवला जाईल या मालिकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांचा समावेश आहे. या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या हातात आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहे. या संघात जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क सारख्या अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, पितृत्व रजेवर असलेले मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांना त्यांची उणीव भासणार आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 108 एकदिवसीय सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्यांनी 70 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजला 34 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. आणि एक सामना बरोबरीत संपला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाकिस्तानची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. पाकिस्तानने येथे खेळल्या गेलेल्या 56 एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ 17 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला काहीतरी विलक्षण कामगिरी करावी लागणार आहे.
कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. चाहत्यांना सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर पाहता येईल. चाहते डिस्ने+ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर (लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रवाह ऑनलाइन पाहू शकतात. (हे देखील वाचा: AUS vs PAK 1st ODI 2024 Preview: पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अग्निपरिक्षा, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून)
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, सीन ॲबॉट, ॲडम झाम्पा.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन: अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, आगा सलमान (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन.