AUS vs NZ 2nd Test: मार्नस लाबूशेन याच्यासाठी मेलबर्न टेस्ट ठरेल खास; डॉन ब्रॅडमन, स्टिव्ह स्मिथ यांच्या एलिट यादीत सामिल होण्याची संधी

एमसीजीमध्ये होणाऱ्या सामन्यात त्याने शतक केले तर तो ऑस्ट्रेलियन खेळाडूने ते सलग चौथे शतक होईल. 1937-38 मध्ये सलग सहा कसोटी सामन्यासह डॉन ब्रॅडमन यांनी तीन वेळा शतक केले होते. 

मार्नस लाबूशेन (Photo Credit: Getty Images)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. लाबूशेनने 2018 पाकिस्तानविरुद्ध मालिकेतून टेस्टमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून यंदाची अ‍ॅशेस मालिका असो किंवा पाकिस्तान, न्यूझीलंड लाबूशेनने दमदार फलंदाजीने संघात आपले स्थान कायम ठेवले. त्याने मागील 3 कसोटी सामन्यांत 58.05 च्या सरासरीने 3 शतके झळकावत 1,103 धावा केल्या आहेत. 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी (New Zealand) होईल. या मॅचमध्ये लाबूशेनला ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या एलिट यादीमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. एमसीजी (MCG) मध्ये होणाऱ्या सामन्यात त्याने शतक केले तर तो ऑस्ट्रेलियन खेळाडूने ते सलग चौथे शतक होईल. इंग्लंडविरुद्ध 1937-38 मध्ये सलग सहा कसोटी सामन्यासह डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांनी तीन वेळा हे कामगिरी बजावली. (AUS vs NZ 2nd Test: 'बॉक्सिंग डे' टेस्टसाठी न्यूझीलंडच्या Playing XI मध्ये दोन बदल,टॉम ब्लंडेल करणार डावाची सुरुवात)

ऑस्ट्रेलियाचा जॅक फिंगल्टन (1936), नील हार्वे (1949-50), मॅथ्यू हेडन (2001-02 आणि 2005) आणि स्टीव्ह स्मिथ (204-15) यांनी कसोटी सामन्यांमध्ये सलग चार शतकं ठोकली आहेत. कसोटी क्रिकेटमधील लाबूशेनसाठी हे एक भव्य वर्ष राहिले आहे.अ‍ॅशेस मालिकेत स्मिथचा (Steve Smith) पर्याय म्हणून तो आला तेव्हापासून त्याने धावा केल्या आणि फलंदाजीच्या क्रमवारीत आपली वेगळीच जागा निर्माण केली. या शानदार मोसमानंतर पुढच्या वर्षी भारत दौर्‍यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात त्याला स्थान देण्यात आले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्टबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने अजून त्यांचा प्लेयिंग इलेव्हन जाहीर केला नाही. पण, ऑस्ट्रेलिया पाच तज्ज्ञ गोलंदाजांसह खेळेल असे समजले जात आहे. मागील दोन बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ट्रॅक निर्जीव राहिला आहे, त्यामुळे 20 विकेट घेणे कठीण झाले आहे. शिवाय, या महिन्यात तेथे एक शेफील्ड शील्ड सामना धोकादायक खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif