Asia XI vs World XI: T-20 सामन्यासाठी BCB ने घोषित केले एशिया आणि वर्ल्ड इलेव्हन संघ; विराट कोहलीसह 6 भारतीय खेळाडूंचा समावेश, पहा यादी

सामना आशिया इलेव्हन (Asia XI) आणि वर्ल्ड इलेव्हन (World XI) यांच्यात होईल

Virat Kohli (Photo Credits: IANS)

पुढील महिन्यात बांग्लादेशच्या (Bangladesh) ढाका येथील शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर, दोन टी-20 (T-20) सामने खेळले जाणार आहेत. सामना आशिया इलेव्हन (Asia XI) आणि वर्ल्ड इलेव्हन (World XI) यांच्यात होईल. बांग्लादेश आपले संस्थापक शेख मुजीबर रहमान (Sheikh Mujibur Rahman) यांच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त, हा सामना आयोजित करीत आहे. हे दोन सामने 18 आणि 21 मार्च रोजी खेळले जाणार आहेत.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आशिया इलेव्हनसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून, त्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांच्या रूपात सहा भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

प्रत्येकी एका सामन्यासाठी आशिया इलेव्हन संघात राहुल आणि विराटची निवड झाली आहे, त्यापैकी विराटचे खेळात राहणे हे, तो त्यावेळी उपलब्ध असेल की नाही यावर अवलंबून असेल. आशिया इलेव्हनमध्ये कोणतेही पाकिस्तानी खेळाडू नाहीत. यापूर्वी बीसीसीआयने, या सामन्यामध्ये भाग घेऊ शकणार्‍या खेळाडूंची यादी बीसीबीला पाठविली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खेळाडूंची उपलब्धता पाहूनच बीसीबीला नावे पाठवली होती.

पाकिस्तानमध्ये ‘पाकिस्तान सुपर लीग’ खेळला जात आहे आणि म्हणूनच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी या दोन्ही सामन्यांपासून स्वत: ला दूर ठेवले आहे. आशिया इलेव्हनमध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि अफगाणिस्तानमधील क्रिकेटपटूंचा समावेश आहे. (हेही वाचा: IPL 2020 पूर्वी एमएस धोनी झाला ट्रोल, चाचा ने विचारलेल्या 'तुम्हारा वाला खेल पाएगा?' च्या प्रश्नावर CSK ने दिलेली प्रतिक्रिया तुमच्या चेहऱ्यावर आणेल हसू)

आशिया इलेव्हन संघः केएल राहुल (एका सामन्यासाठी), शिखर धवन, तमीम इक्बाल, विराट कोहली (एका सामन्यासाठी, मात्र ते खेळणेही त्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल), लिटन दास, ऋषभ पंत, मुशफिकुर रहीम, तिसारा परेरा, राशिद खान,  मुस्तफिजुर रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मुजीब उर रहमान.

वर्ल्ड इलेव्हन संघः अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस गेल, फैफ डु प्लेसी (कॅप्टन), निकोलस पूरन, रॉस टेलर, जॉनी बेअरस्टो, कीरन पोलार्ड, आदिल रशीद, शेल्डन कोटरल, लुंगी एनगीडी, अँड्र्यू टाय, मिचेल मॅक्लिग्नेन.