एशिया कप 2018 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर उडवण्यात आली पाकिस्तानची खिल्ली !
पाकिस्तानला या टुर्नामेंटमध्ये मिळालेल्या अपयशाबद्दल सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.
शिखर धवन (114) आणि कर्णधार रोहित शर्मा (नाबाद 111) यांच्या दमदार शतकांमुळे भारताने पाकिस्तानचा 9 विकेटने पराभव केला आणि एशिया कप 2018 च्या अंतिम फेरीत भारताने आपले स्थान पक्के केले. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमच्या सुपर-4 सामन्यात पहिल्यांदा बॉलिंग केली. पाकिस्तानने 7 विकेट गमावत 237 रन्स केले. भारताने दमदार खेळी करत 39.3 ओव्हरमध्ये एक विकेट गमावत लक्ष्य हासिल केले. 238 रन्सचे लक्ष्य समोर ठेवत शिखर आणि रोहीतने 210 रन्सची पार्टनरशिप केली.
भारताने याच टुर्नामेंटमधील दुसऱ्या मॅचमध्ये 19 सप्टेंबरला पाकिस्तानला आठ विकेटने हरवले. पाकिस्तानला या टुर्नामेंटमध्ये मिळालेल्या अपयशाबद्दल सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.
भारतीय टीममधून युजवेंद्र चहरने 46 रन्समध्ये 2 विकेट, कुलदीप यादवने 41 रन्समध्ये 2 विकेट आणि जसप्रीत बुमराहने 29 रन्समध्ये 2 विकेट घेतल्या.