Asia Cup 2020:अखेर आशिया चषक 2021 पर्यंत स्थगित, COVID-19 Pandemic प्रादुर्भावामुळे ACC चा निर्णय
एशियन क्रिकेट कौन्सिलने (एसीसी) गुरुवारी याची घोषणा केली. आशिया चषक सप्टेंबरमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आघाडीवर होणार होता, परंतु या स्पर्धेचे वेळापत्रक आता जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
कोविड-19 मुळे आशिया चषक (Asia Cup) 2020 अखेरीस पुढे ढकलण्यात आले आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलने (ACC) गुरुवारी याची घोषणा केली. आशिया चषक सप्टेंबरमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आघाडीवर होणार होता, परंतु या स्पर्धेचे वेळापत्रक आता जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. पाकिस्तानकडे आशिया चषक 2021 आयोजनाचे अधिकार होते परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) श्रीलंका क्रिकेटसह (SCL) आयोजनाच्या हक्कांची देवाणघेवाण केली, असे एसीसीने म्हटले आहे. श्रीलंका आता 2021 मध्ये पुन्हा ठरलेल्या स्पर्धेचे आयोजन करेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशिया चषक पुढे ढकलल्याचे सांगितल्यानंतर एसीसीने अधिकृत पुष्टी केली. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी गेल्या महिन्यात आशिया चषक वेळेत ठरल्याप्रमाणे पुढे जाईल परंतु कोविड-19 ने विलंब करण्यास भाग पाडले आहेअसे सांगितले होते. (Asia Cup 2020 Cancelled: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक 2020 रद्द; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची घोषणा)
“जबाबदार पद्धतीने कार्यक्रम आयोजित करणे हे एसीसीचे प्राधान्य राहिले आहे आणि 2021 मध्ये ही स्पर्धा होईल अशी मंडळाला आशा आहे. एसीसी सध्या स्पर्धेसाठी उपयुक्त विंडो म्हणून जून 2021 पर्यंत जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे," एसीसीने सांगितले. "हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की पीसीबीने आशिया चषक 2020 आयोजनाचे अधिकार श्रीलंका क्रिकेट बोर्डला दिले आहे. या व्यवस्थेद्वारे एसएलसी आता जून 2021 मध्ये अपेक्षित पुनर्निर्धारित आशिया चषक आयोजित करेल तर पीसीबी 2022 मध्ये आशिया चषक आयोजित करेल."
दरम्यान, आशिया चषक स्थगित झाल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात सर्वात लोकप्रिय असणारी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 2020 आयोजन केले जाऊ शकते. बीसीसीआय सुरुवातीपासून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलच्या आयोजनाचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांच्यासाठी हे सर्व टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलल्याने शक्य होईल. दरम्यान, आयसीसीने अद्यापटी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत कोटही निर्णय दिलेला नाही.