Ashes 2019:बेन स्टोक्स याच्या धमाकेदार खेळीने तब्बल 96 वर्षांनंतर इंग्लंडने नोंदवला असा पराक्रम!

या धमाकेदारी खेळीत त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले आहेत. महत्वाचे म्हणजे त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचसह महत्त्वपूर्ण नाबाद ७६ धावांची भागीदारीही केली आहे. बेन स्टोक्स हा नेहमी इंग्लंडच्या संघासाठी मोठे योगदान देत आला आहे. यासाठी अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतूकही केले आहे.

Ben Stokes (photo credit: twitter)

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England Vs Australia) संघात हेडिंग्ले, लीड्स येथे तिसरा कसोटी सामना पार पडला. 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाने हा सामना जिंकून 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात इंग्लंडचा ऑलरांउडर खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने धमाकेदार शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवत एका पराक्रमाची नोंदणी केली आहे. इंग्लंडच्या संघाने हा सामना केवळ एका विकेटने जिंकला आहे. इंग्लंडने कसोटी सामना एका विकेटने जिंकण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. याआधी इंग्लंडने कसोटीत एका विकेटने 96 वर्षांपूर्वी शेवटचा विजय मिळवला होता.

इंग्लंडने कसोटी सामन्यात 1 विकेटने मिळवलेले विजय-

1902- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल

1908- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न

1923- विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन

2019- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लीड्स

हे देखील वाचा-IND vs WI 1st Test: विराट कोहली याने मोडला सौरव गांगुली याचा सर्वात मोठा रेकॉर्ड, एमएस धोनी याच्याशी साधली बरोबरी, वाचा सविस्तर

रविवारी पार पडलेल्या तिसऱ्या अॅशेस कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने नाबाद 135 धावांची शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला आहे. या धमाकेदारी खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत. महत्वाचे म्हणजे त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचसह महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही केली आहे. बेन स्टोक्स हा नेहमी इंग्लंडच्या संघासाठी मोठे योगदान देत आला आहे. यासाठी अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतूकही केले आहे.

बेन स्टोक्सचे कौतूक करताना अनेक खेळाडूंनी केलेले ट्वीट-

भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (sachin tendulker) आणि ऑस्ट्रेलियाचा यशस्वी फिरकी गोलंदाज शेन वार्न ( shane warne) यानेही बेन स्टोक्सला उत्तम कामगिरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



संबंधित बातम्या