Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधील शाब्दिक युद्ध जोरात, टीम पेन म्हणाला - ‘जो रूटसह किंवा त्याच्याशिवाय मालिका होणार’

संघाचा कर्णधार टिम पेनने इंग्लिश कर्णधार जो रूटवर निशाणा साधला आणि म्हटले आहे की, इंग्लंडचा कर्णधार आला किंवा नाही, मालिका आपल्या वेळापत्रकानुसार सुरु होईल.

जो रूट व टिम पेन (Photo Credit: @ESPNcricinfo/Twitter)

कोरोना, क्वारंटाईन आणि लॉकडाऊनचा क्रिकेट सामन्यांवर सतत परिणाम होत आहे. अनेक प्रमुख स्पर्धा आणि मालिका यामुळे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) देखील प्रभावित होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही संघांची शत्रुत्व आणि कटुता सर्वश्रुत आहे, परंतु या क्षणी केवळ मालिका होत आहे की नाही याबद्दल शाब्दिक हल्ले तीव्र होत आहेत. अलीकडील हल्ला ऑस्ट्रेलियाच्या शिबिरातून आला आहे, ज्यामध्ये संघाचा कर्णधार टिम पेनने (Tim Paine) इंग्लिश कर्णधार जो रूटवर (Joe Root) निशाणा साधला आहे. पेनने म्हटले आहे की, इंग्लंडचा कर्णधार ऑस्ट्रेलियात आला किंवा नाही, मालिका आपल्या वेळापत्रकानुसार सुरु होईल. अ‍ॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाणार आहे. (Ashes 2021-22: अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडमध्ये संकट, ऑस्ट्रेलियातील ‘या’ नियमामुळे इंग्लिश खेळाडू करू शकतात बंड)

पाच सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ नोव्हेंबर अखेरीस ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. परंतु ऑस्ट्रेलियन सरकारला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बनवलेल्या कडक क्वारंटाईन आणि बायो-बबल नियमांमुळे इंग्लंड क्रिकेटपटूंनी आक्षेप नोंदवले आहेत. इंग्लिश क्रिकेटपटूंची इच्छा आहे की त्यांना त्यांच्या कुटुंबांना सोबत आणण्याची परवानगी द्यावी, पण ऑस्ट्रेलियन सरकार ही सूट देण्यास तयार नाही. याच कारणामुळे अनेक मोठे खेळाडू मालिकेतून माघार घेण्याच्या तयारीत आहेत. ‘सेन होबार्ट’ शी संवाद साधताना पेन म्हणाला, “अॅशेस होणार आहे. जो (रूट) इथे येतो की नाही याची पर्वा न करता पहिली कसोटी 8 डिसेंबरपासून सुरू होते. त्या सर्वांना यायचे आहे, यात शंका नाही. ते स्वतःला सर्वोत्तम परिस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण शेवटी आपण सगळे तेच करत आहोत. त्याला येथे येण्यासाठी फ्लाइटमध्ये बसायचे आहे की नाही हे त्याच्याकडे आहे. कोणीही इंग्लंडच्या खेळाडूंना येथे येण्यास भाग पाडत नाही. आपण ज्या जगामध्ये राहतो त्याचे सौंदर्य हे आहे की आपल्याकडे पर्याय आहे. तुला यायचे नसेल तर येऊ नकोस.”

रूटने अलीकडेच सांगितले होते की तो अ‍ॅशेस मालिका खेळण्यास उत्सुक आहे, परंतु तो जाणार की नाही याबाबत तो ठाम निर्णय घेऊ शकत नाही. केवळ रूटच नाही तर इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरनेही कुटुंबाशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास संकोच व्यक्त केला आहे. इंग्लंड कसोटी संघातील काही खेळाडू टी-20 विश्वचषक संघाचा देखील भाग आहेत आणि ते ऑक्टोबरपासून यूएईमध्ये बायो-बबलमध्ये असतील. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार, हे खेळाडू विश्वचषकानंतर लगेचच कसोटी संघातील इतर खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. अ‍ॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होईल आणि सुमारे दीड महिने चालणार आहे. म्हणजेच, खेळाडूंना सलग दीड महिने कठोर बायो-बबलमध्ये राहावे लागेल.