Ashes कव्हर करायला गेलेल्या ऑस्ट्रेलियाई पत्रकाराकडून एका बीअरसाठी हॉटेलने चार्ज केले 50 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

इंग्लंडमधील हॉटेलमध्ये पत्रकाराबरोबर ही घटना घडली. नंतर पत्रकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण घटना उघडकीस आणली.

International Beer Day 2019 (Photo Credits: Pixabay)

हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका व्यक्तीला हॉटेलमध्ये बिअरची (Beer) मागणी करणे महाग झाले. घडले असे की, इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मधील अ‍ॅशेस (Ashes) मालिका कव्हर करायला गेलेल्या या ऑस्ट्रेलियाई पत्रकाराने हॉटेलमधून बिअर घेतली तर त्याला या बिअरसाठी चक्क 55 हजार पौंड म्हणजे सुमारे 50 लाख रुपयांचे बिल भरावे लागले.  बिल पाहताच या व्यक्तीचे त्यावर विश्वास बसेना. मात्र, हॉटेलवरून कन्फर्म केल्यावर त्याला 55 हजार पौंड म्हणजेच एका बिअरसाठी सुमारे 50 लाख रुपये द्यावे लागले. इंग्लंडमधील हॉटेलमध्ये पत्रकाराबरोबर ही घटना घडली. नंतर पत्रकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण घटना उघडकीस आणली. (Ashes 2019: चौथ्या टेस्टमध्ये स्टीव्ह स्मिथ याचे विक्रमी अर्धशतक; विराट कोहली, ब्रायन लारा यांची बरोबरी करत केली अनेक विक्रमांची नोंद)

ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर (Peter Lalor) अ‍ॅशेस कव्हर करण्यासाठी इंग्लंडला गेला होता आणि मँचेस्टर टेस्ट कव्हर करण्यासाठी मल्लमसन नावाच्या हॉटेलमध्ये ते थांबले होते. रात्रीच्या वेळी त्यांनी स्वत:साठी बिअरची मागणी केली आणि त्यासाठी हॉटेलने त्यांना 99,983.64 ऑस्ट्रेलियन डॉलर्स दिले जे भारतीय रुपयांनुसार 49 लाख रुपयांचे बिल थमावले. मग पीटरने ट्विटरवर लिहिले की,  "आपण ही बीअर पाहिली आहे ..? ही इतिहासातील सर्वात महाग बिअर आहे. आज मॅनचेस्टरमध्ये मी त्यासाठी 99,983.64 ऑस्ट्रेलियन डॉलर्स भरले. मी खरं सांगत आहे." पीटरने आपल्या पोस्टसह बिअरची बाटली आणि काचेच्या ग्लासचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये बीयर भरलेली दिसतेय.

दरम्यान, बिलमध्ये इतके पैसे गेल्यावर पीटरने लगेच हॉटेलच्या मॅनेजरकडे धाव घेतली आणि बिलमध्ये करेक्शन करण्यास सांगितले. मॅनेजरने आश्वासन दिले की, लवकरच त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. यानंतर, पीटरने आणखी एक ट्वीट करत म्हटले की, "ही चांगली बीअर आहे आणि त्याच्या मूळ आवृत्तीला बरेच पुरस्कारदेखील मिळाले आहेत आणि त्याला ब्रिटनच्या सुप्रीम चॅम्पियन बिअरचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे परंतु आपण असा विचार करत असाल तर एखाद्याने बिअरसुद्धा 10 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरपेक्षा जास्त असू शकत नाही, म्हणून मी आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे. एका अहवालानुसार या बिअरची किंमत 9.91 ऑस्ट्रेलियन डॉलर होती. भारतीय रुपयांमध्ये बदलल्यास त्याची किंमत 486 रुपये इतकी होते.



संबंधित बातम्या