Ashes 2019: इंग्लंडविरुद्ध हेडींगले टेस्टमध्ये मार्नस लाबुशेन याने इतिहास रचला; डॉन ब्रॅडमन, मॅथ्यू हेडन यांच्यासह 'या' यादीत झाला समावेश
इंग्लंडविरुद्ध लीड्स टेस्टच्या दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनने 80 धावा केल्या. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातही 74 धावा केल्या. यासह, लाबुशेनने एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत विरोधी संघाच्या पहिल्या डावातील एकूण धावांपेक्षा जास्त धावा करणारा लाबुशेन हा जगातील पाचवा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज बनला आहे.
इंग्लंड (England) विरुद्ध लीड्स (Leeds) टेस्टच्या दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने 80 धावा केल्या. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातही 74 धावा केल्या. लॉर्ड्सच्या सामन्यात देखील त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथ याचा सबस्टिट्युट म्हणून 59 धावा केल्या आणि आपल्या संघाला पराभवापासून वाचविले. लाबुशेनचे हे सलग तिसरे अर्धशतक होते. आणि यासह, लाबुशेनने अन्य खेळाडूंसह एका विशिष्ट यादवीत आपले नाव नोंदविले. एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत विरोधी संघाच्या पहिल्या डावातील एकूण धावांपेक्षा जास्त धावा करणारा लाबुशेन हा जगातील पाचवा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज बनला आहे. लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 67 धावांवर संपुष्टात आला. तर लबूशेनने पहिल्या डावात 74 आणि दुसर्या डावात 80 धावा केल्या. (Ashes 2019: स्टुअर्ट ब्रॉड याने निर्णय बदलण्यासाठी थर्ड अंपायरला स्टंप माइकद्वारे केली विनंती, पहा Video)
67 धावा, हा इंग्लंडचा अॅशेसच्या इतिहासातील मागील 71 वर्षातील सर्वात कमी धावसंख्या आहे. दरम्यान, या यादीत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांचादेखील समावेश आहे. या यादीत लाबुशेन आणि लॅंगर व्यतिरिक्त डॉन ब्रॅडमन (Don Bradman), गार्डन ग्रीन आणि मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) यासारख्या समावेश आहे. ब्रॅडमनने 1948 मध्ये भारतविरुद्ध नाबाद 132 आणि नाबाद 127 धावा केल्या तर भारतीय संघ 125 धावांवर बाद झाला. हेडनने 2002 मध्ये ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्ध 197 आणि 103 धावांची खेळी केली तर इंग्लंड 79 धावांवर बाद झाला. शिवाय, 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लँगरने 191 आणि 97 धावा केल्या जेथे पाकिस्तानचा डाव केवळ 72 धावांवर संपुष्टात आला.
दुसरीकडे, लाबुशेनच्या दमदार खेळीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 246 धावा केल्या. बदली खेळाडू म्हणून मालिकेच्या दुसऱ्या डावात लाबुशेनने सलग तिसरे अर्धशतक केले. इंग्लंडला विजयासाठी 359 धावांचे कठीण लक्ष्य मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियन जर या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाले तर ते पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांना २-० अशी आघाडी मिळवून अॅशेस ट्रॉफी टिकवून ठेवतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)