Ashes 2019: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा जर्सीवर असणार खेळाडूंचे नाव आणि नंबर, पहा हे (Photos)
या मालिकेपासून वनडे आणि टी-20 प्रमाणेच टेस्ट क्रिकेटमध्ये प्रथमच जर्सीवर खेळाडूंची नावे, नंबर असणार आहे.
इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात 1 ऑगस्ट पासून प्रसिद्ध अॅशेस (Ashes) मालिकेला सुरुवात होत आहे. यंदाचे अॅशेस इंग्लंडमध्ये खेळले जातील. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया खेळाडूंचा फॉर्म पाहता यजमान इंग्लंड देशाचे पारडे जड दिसत आहे. अॅशेस मालिका दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. या मालिकादरम्यान, आयसीसीकडून काही नवीन नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या मालिकेपासून वनडे आणि टी-20 प्रमाणेच टेस्ट क्रिकेटमध्ये प्रथमच अॅशेस जर्सीवर खेळाडूंची नावे, नंबर असणार आहे. याबद्दल माहिती देत इंग्लंड क्रिकेटने खेळाडूंचे नवीन जर्सीमधील काही फोटोज शेअर केले आहेत. (Ashes 2019: शेन वॉर्नने निवडला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया 12 सदस्यीय अॅशेस संघ; जोफ्रा आर्चर, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश)
या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिका दरम्यान क्रिकेट किटचे आधुनिकीकरण करणार असल्याचे वृत्त आले होते. इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलने टीमच्या टेस्ट मॅच कर्णधार जो रूट यांची जर्सी नंबरची पुष्टी केली आणि कॅप्शन म्हणून "कसोटी शर्टच्या मागे नावे आणि नंबर" लिहिले. दरम्यान, अॅशेसमध्ये केलेल्या या बदलावावर सोशल मीडियावर चाहत्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दुसरीकडे, यंदाच्या सीरिजपासून आयसीसीकडून सबस्टिट्यूट खेळाडूचा नवीन नियम लागू होऊ शकतो. एखाद्या खेळाडू्च्या डोक्याला जखम झाली तर त्या खेळाडूऐवजी सबस्टिट्यूट खेळाडू खेळू शकतो. क्रिकेटच्या मैदानात अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे. काहींचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्यूजेस याचा खेळताना डोक्याला चेंडू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.