Ashes 2019: मँचेस्टर टेस्टमध्ये ड्रेसिंग रूममधून बाहेर पडताना डेव्हिड वॉर्नरला चाहते म्हणाले 'चीटर', वॉर्नर ने खास अंदाजात दिले प्रत्युत्तर, पहा Video
मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात वॉर्नर ड्रेसिंग रूममधून मैदानाच्या दिशेने येण्यासाठी पायऱ्या उतरत होता. तेवढ्यात, एक इंग्रजी दर्शक ओरडला, "वॉर्नर यू चीट". प्रत्युत्तरात वॉर्नर प्रेक्षकांकडे वळून ओरडला आणि त्याला ऑल द बेस्ट म्हटले.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्यासाठी यंदाचा अॅशेस (Ashes) दौरा जरा कठीणच झाला आहे. कारण असे की 12 महिन्यांनंतर मैदानावर परतणार्या दोन्ही फलंदाजांना इंग्लंडचे चाहते ट्रोल करत आहेत. एकीकडे स्मिथ त्याच्या उत्तम फलंदाजीद्वारे उत्तर देत आहे, परंतु वॉर्नरची बॅट अॅशेसमध्ये अजूनही चालू शकली नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर दबाव बनत चालला आहे. या मालिकेत डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत 7 डावांमध्ये केवळ 79 धावा केल्या आहेत. वॉर्नर आणि स्मिथ यांनी 16 महिन्यांनंतर इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहेत. तथापि, खराब कामगिरी असूनही वॉर्नर या मालिकेतल्या त्याच्या वागण्याने चर्चेत बनून राहिला आहे. (Ashes Series 2019: स्टीव्ह स्मिथ याचे धमाकेदार शतक)
ऑस्ट्रेलिया संघ गेल्या 2 महिन्यांपासून इंग्लंडमध्ये आहे. आयसीसी विश्वचषकानंतर आता कांगारू संघ अॅशेस मालिकेत यजमानांविरूद्ध खेळत आहे. यावेळी इंग्लंडचे चाहते त्याच्या बॉल टेम्परिंग प्रसंगावर सतत ऐकवत असताना दिसतात. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. चौथ्या टेस्टच्या तिसर्या दिवशी वॉर्नर ड्रेसिंग रूममधून मैदानाच्या दिशेने येण्यासाठी पायऱ्या उतरत होता. तेवढ्यात, एक इंग्रजी दर्शक ओरडला, "वॉर्नर यू चीट". प्रत्युत्तरात वॉर्नर प्रेक्षकांकडे वळून ओरडला आणि त्याला ऑल द बेस्ट म्हटले.
यापूर्वी मालिकेच्या पहिल्या सामन्यात वॉर्नर जेव्हा सीमारेषेच्या जवळ उभा होता त्यावेळी इंग्लिश चाहत्यांनी त्याला सँडपेपर दाखवत त्याची हुटींग केली. प्रत्युत्तरादाखल वॉर्नरने आपले दोन्ही हात खिशात घातले आणि रिक्त खिशात दाखवले. दुसरीकडे, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जाणार्या अॅशेस मालिकेमध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहे. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 497 धावांच्या उत्तरात इंग्लंडने तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 200 धावांत 5 गडी गमावले आहेत. यजमान इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या 297 धावा अजूनही मागे आहे. या मालिकेत स्मिथने आतापर्यंत 500 हून अधिक धावा केल्या आहेत. मालिकेचा शेवटचा आणि पाचवा सामना ओव्हल, लंडन येथे खेळला जाईल.