Asghar Afghan Equals MS Dhoni's T20I record: अफगाणिस्तानच्या असगर अफगाणने रचला इतिहास, एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी
अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाणने शुक्रवारी एम एस धोनीच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असगरचा हा 41वा विजय ठरला आणि सर्वात जास्त विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीमध्ये भारताचा दोन वर्ल्ड कप विजेता एमएस धोनीची अव्वल स्थानावर बरोबरी केली.
AFG vs ZIM 2nd T20I 2021: अफगाणिस्तानचा (Afghanistan) कर्णधार असगर अफगाणने (Asghar Afghan) शुक्रवारी एम एस धोनीच्या (MS Dhoni) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. अबू धाबी येथे झालेल्या दुसर्या टी-20 मध्ये सीन विल्यम्सच्या (Sean Williamson) नेतृत्त्वातील झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाला असगरच्या संघाविरुद्ध 45 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह अफगाणिस्तानने मालिकेमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेचा एक सामना अद्याप शिल्लक आहे. कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असगरचा हा 41वा विजय ठरला आणि सर्वात जास्त विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीमध्ये भारताचा दोन वर्ल्ड कप विजेता एमएस धोनीची अव्वल स्थानावर बरोबरी केली. कर्णधार म्हणून धोनीने 72 सामन्यात 41 सामने जिंकले होते, तर असगरने आतापर्यंत 51 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 41 सामने जिंकले आहेत. अशास्थितीत, धोनीची विजयी सरासरी 59.28 टक्के तर असगरची 81.37 टक्के आहे. (IND vs ENG 4th Test 2021: एमएस धोनीची बरोबरी करत Virat Kohli ने रचला इतिहास, भारतीय कर्णधारांच्या एलिट यादीत संयुक्तपणे पटकावले पहिले स्थान)
अफगाणिस्तान कर्णधाराच्या तुलनेत धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत उच्चपदस्थ असलेल्या संघांचा सामना केला होता हे लक्षात घेतले पाहिजे. धोनीने 2007 ते 2016 दरम्यान टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळले होते, तर असगरला पहिल्यांदा 2015 मध्ये अफगाणिस्तान संघाच्या टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 चा टी 20 आय वर्ल्ड कप देखील जिंकला आहे. सामन्यानंतर बोलताना असगर म्हणाला, "टी-20 वर्ल्ड कप आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही जिंकलात तर मनोबल उंच आहे. आज करीम आणि उस्मानची भागीदारी खरोखर चांगली होती."शनिवारी अंतिम टी-20 सामन्यात दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने येतील.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधार म्हणून संघाला सर्वाधिक सामने जिंकवून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गन 33 विजयांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने 20 विजय, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने 27 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, अफगाणने कर्णधार असताना सर्वाधिक 12 सामने आयर्लंडविरुद्ध जिंकले असून झिम्बाब्वेविरुद्ध 9, युएई-ओमानविरुद्ध प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत. लक्षात घेण्यासारखे म्हणजे अफगाणिस्तानला मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी क्वचितच मिळते. अशास्थितीत, त्यांना अद्याप इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)