IND vs AUS: मैदानात पाऊल ठेवताच विराट-रोहित आणि धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये सामील होणार हार्दिक, मिळेल मोठी उपलब्धी
एकदिवसीय क्रिकेटमधला कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना आहे आणि मैदानावर पाऊल ठेवताच तो एकदिवसीय क्रिकेटमधला भारताचा 27 वा कर्णधार बनेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कौटुंबिक कारणांमुळे या सामन्यात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधला कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना आहे आणि मैदानावर पाऊल ठेवताच तो एकदिवसीय क्रिकेटमधला भारताचा 27 वा कर्णधार बनेल. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील पहिला एकदिवसीय कर्णधार अजित वाडेकर (Ajit Wadekar) आहे, ज्यांनी 1974 मध्ये 2 सामन्यात कर्णधारपद भूषवले होते.
अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन्ही सामने गमावले. तेव्हापासून 26 भारतीय खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. जास्तीत जास्त सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर महेंद्रसिंह धोनीचे नाव येते, ज्याने या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून भारताला विश्वचषक जिंकून दिला. त्यांच्या आधी कपिल देव यांनी 1983 मध्ये भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला होता. (हे देखील वाचा: IND vs AUS 1st ODI Live Streaming Online: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज खेळवला जाणार पहिला वनडे सामना, जाणून घ्या कुठे पाहणार लाइव्ह)
भारताच्या एकदिवसीय संघाचे हे 26 कर्णधार
1. अजित वाडेकर,
2. श्रीनिवास वेंकटराघवन,
3. बिशनसिंग बेदी,
4. सुनील गावस्कर
5. गुंडप्पा विश्वनाथ
6. कपिल देव
7. सय्यद किरमाणी
8. मोहिंदर अमरनाथ
9. रवी शास्त्री
10. दिलीप वेंगसरकर
11. के श्रीकांत
12. मोहम्मद अझरुद्दीन
13. सचिन तेंडुलकर
14. अजय जडेजा
15. सौरव गांगुली
16. राहुल द्रविड
17. अनिल कुंबळे
18. वीरेंद्र सेहवाग
19. एमएस धोनी
20. सुरेश रैना
21. गौतम गंभीर
22. विराट कोहली
23. अजिंक्य रहाणे
24. रोहित शर्मा
25. शिखर धवन
26. केएल राहुल
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही खेळाडू
टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा