अर्जुन तेंडुलकर याची Vizzy Trophy साठी मुंबई संघात निवड

अर्जुन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा याची 22 ऑगस्टपासून आंध्र प्रदेशात होणाऱ्या व्हिझी ट्रॉफीसाठी मुंबईच्या 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.

Arjun Tendulkar | (Photo Credits: Twitter @HomeOfCricket)

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar), मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा याची 22 ऑगस्टपासून आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) होणाऱ्या व्हिझी ट्रॉफी (Vizzy Trophy) साठी मुंबईच्या 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. अर्जुन हा हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याच्या नावावर असलेल्या आकडेवारीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला 50 ओव्हरच्या स्पर्धेसाठी त्याची निवड केली आहे. यापूर्वी 19 वर्षीय अर्जुन टी-20 मुंबई लीगमध्ये खेळला होता. शिवाय या मुंबईकरने अनेकदा भारतीय संघाला नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. यानिमित्ताने त्याला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या समवेत वेळ घालवण्याचा आणि बरेच काही शिकायला मिळले. विनू मंकड अंडर-19 करंडक स्पर्धेत तो मुंबई संघाचा सदस्य होता. आणि आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

टी-20 मुंबई लीगमध्ये आकाश टायगर्स (Aakash Tigers) मुंबई वेस्टर्न सबर्ब संघाकडून आरजू खेळाला. मुंबई लीगसाठी झालेल्या लिलावात आकाश टायगर्सने पाच लाख रुपये मोजून अर्जुनला आपल्या संघात स्थान दिलं.

असा आहे मुंबईचा संघ:

हार्दिक तमोरे (कॅप्टन), सृजन आठवले, रुद्र धांडे, चिन्मय सुतार, आशय सरदेसाई, साईराज पाटील, ओंकार जाधव, सत्यलक्ष जैन,मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अमन शेरॉन, अथर्व पुजारी, मॅक्सवेल स्वामिनाथन, प्रशांत सोळंकी आणि विग्नेश सोलंकी.