Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 52 वा वाढदिवस; प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकांवर एक नजर टाकू
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 शतके ठोकली आहेत, तो 24 वर्षांपासून भारतासाठी खेळत आहे. मास्टर ब्लास्टर त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत असताना त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकाची झलक पाहूत.
Sachin Tendulkar Birthday: सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा क्रिकेटमधील आतापर्यंतचा महान फलंदाज आहे. त्याने भारतासाठी 200 कसोटी सामने आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत 15,921 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 18,426 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 53.78 आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सरासरी 44.83 आहे. पण, एक विक्रम त्याला सर्वात मोठा दिग्गज बनवतो. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचे 100 शतके. 24 एप्रिल 2025 रोजी त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत असताना, सचिन तेंडुलकरने सर्व स्वरूपात झळकावलेल्या अनेक शतकांपैकी पहिले शतकावर आपण नजर टाकूत. क्रिकेटमधील कसोटी, एकदिवसीय किंवा टी20 असो सर्व फॉर्मेटमधील त्याची कामगिरी पाहू.Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
कसोटीतील पहिले शतक: इंग्लंडविरुद्ध 119,1990
1990 च्या मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारताच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी, सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रिय क्रिकेटमध्ये स्थान मिळवल होत. 9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यजमान इंग्लंडने 519 धावा केल्या. भारताने जोरदार प्रत्युत्तर देत 432 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने 320 धावा केल्या आणि डाव घोषित केला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना, 17 वर्षीय सचिनने संपूर्ण जबाबदारी घेतली आणि आपले पहिले शतक झळकावले, नाबाद 119 धावा केल्या. सचिनने त्या दिवशी भारताचा पराभव वाचवला आणि संघाला सामना अनिर्णीत ठेवण्यास मदत केली. त्याने 119 धावा 189 चेंडूत, सतरा चौकारांसह केल्या होत्या.
एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110,1994
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतके ठोकली आहेत. परंतु त्याचे पहिले शतक खूप उशिरा आले. 76 डावात फलंदाजी केल्यानंतर, सचिन अखेर त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावू शकला. हे शतक 9 सप्टेंबर 1994 रोजी कोलंबो येथे झालेल्या वर्ल्ड सिरीजमध्ये झाले. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सचिनने 130 चेंडूत 110 धावा केल्या. त्याने ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न आणि स्टीव्ह वॉ सारख्या आघाडीच्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी केली. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सचिनच्या खेळीमुळे भारताने 246/8 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ केवळ 215 धावांवर गुंडाळला गेला. सचिनला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
आयपीएलमधील पहिले शतक: कोची टस्कर्स केरळ विरुद्ध 100, 2011
सचिन तेंडुलकर त्याच्या शानदार कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असताना टी 20 हा क्रिकेटमध्ये एक मोठा खेळ बनला. म्हणून, तो भारतासाठी फक्त एक टी 20 सामना खेळला. तथापि, मुंबई इंडियन्ससोबतची त्याची आयपीएल कारकीर्द खूप प्रभावी राहिली आहे. 2011 च्या आयपीएलमध्ये त्याने एक शतकही केले आहे, त्याने मुंबईत कोची टस्कर्स केरळविरुद्ध 66 चेंडूत 100 धावा केल्या. एमआयने प्रथम फलंदाजी करताना 182/2 धावा काढल्या.
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2025 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

