Wasim Jaffer यांच्यावर संघ निवडीत मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप; अनिल कुंबळे, इरफान पठाणसह भारतीय क्रिकेटपटूंचा पाठिंबा
मुस्लीम क्रिकेटपटूला निवडीसाठी प्राधान्य आणि जैव-सुरक्षित वातावरणात ड्रेसिंग रूममध्ये नमाजासाठी मौलवींना आमंत्रित केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते.
उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या (Uttarakhan Cricket Association) प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱ्या भारताचे रणजी हिरो वसीम जाफर (Wasim Jaffer) यांना भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble), माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि मनोज तिवारी (Manoj Tiwary) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मुस्लीम क्रिकेटपटूला निवडीसाठी प्राधान्य आणि जैव-सुरक्षित वातावरणात ड्रेसिंग रूममध्ये नमाजासाठी मौलवींना आमंत्रित केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते. जाफरने स्वत: चा बचाव करत असलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अनिल कुंबळे यांनी "तुझ्यासमवेत वसीम. योग्य गोष्ट केली. दुर्दैवाने खेळाडूंना तुझे मार्गदर्शन मिळणार नाही," असे लिहिले. भारतासाठी 31 कसोटी सामने आणि घरगुती क्रिकेटमधील एक नावाजलेले नाव असलेल्या 42 वर्षीय वसीम यांनी सांगितले की, "मुस्लिम खेळाडूंना पाठिंबा देण्याचा उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव माहीम वर्मा यांनी एका माध्यम अहवालात त्यांच्यावर लादलेल्या आरोपांमुळे त्यांना भरपूर वेदना झाल्या आहेत."
अनिल कुंबळे आणि वसिम जाफर हे दोघेही एकत्र खेळण्याशिवाय सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये सहकारी आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वातील पंजाब संघाचे दिग्गज फिरकीपटू मुख्य प्रशिक्षक असून, जाफर फलंदाजी प्रशिक्षक आहेत. अनिल कुंबळेचे ट्विट
‘‘तुला हे सारे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे, हेच दुर्दैवी आहे,’’ असे पठाणनेही वसीम यांच्या समर्थानात ट्विट करत म्हटले.
‘‘मी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करणार आहे,’’ असे तिवारीने म्हटले आहे.
दोडा गणेश
दुसरीकडे, जाफर यांनी मंगळवारी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत हस्तक्षेप आणि पक्षपाती निवडसमिती ही कारणे सांगितली. “संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे” असे वसीम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले. इतकंच नाही तर जाफर यांनी संघाच्या प्रशिक्षणादरम्यान मौलवींना आणल्याचा आरोपही फेटाळून लावला. जाफरच्या म्हणण्यानुसार, संघाच्या प्रशिक्षणानंतर प्रार्थना झाली आणि तो मुद्दा का बनला हे त्यांना समजत नाही. जाफर हे भारतातील घरेलू क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी आपल्या फलंदाजीने दबदबा निर्माण केला असून ते स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत.