PBKS vs DC, TATA IPL 2025 66th Match Key Players: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

पंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ बाहेर पडले असुन या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पंजाब किंग्जसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

PBKS vs DC (Photo Credit - X)

Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 66th Match Stats:  इंडियन प्रीमियर लीग 2025 त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या हंगामातील 66 वा सामना आज म्हणजेच 24 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाईल. पंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ बाहेर पडले असुन या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पंजाब किंग्जसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. (हे देखील वाचा: PBKS vs DC T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात पंजाब आणि दिल्ली यांची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर)

हेड टू हेड रेकॉर्ड (PBKS vs DC Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामने समान लढतीचे झाले आहेत. पंजाब किंग्जच्या संघाने 17 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 16 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या दरम्यान पंजाब किंग्जने विजय मिळवला होता. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारायची आहे.

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

श्रेयस अय्यर: पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 97* धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला दमदार विजय मिळवून दिला. श्रेयस त्याच्या क्लासिकल फटक्यांसाठी आणि अचूक फलंदाजीसाठी ओळखला जातो. लखनौच्या संथ खेळपट्टीवर त्याची भूमिका आणखी महत्त्वाची बनते, कारण तो एक संयमी फलंदाज आहे आणि त्याच्यात डाव हाताळण्याची क्षमता आहे.

शशांक सिंग: पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंग त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगला फॉर्मही दाखवला आहे. तो पंजाबसाठी उपयुक्त फिनिशर ठरू शकतो आणि जर संघाला शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा करायच्या असतील तर शशांक सिंग त्याची भूमिका चांगल्या प्रकारे बजावू शकतो.

अर्शदीप सिंग: पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही तो उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि विरोधी फलंदाजांसाठी तो अडचणी निर्माण करू शकतो. जर लखनौच्या खेळपट्टीवर दव पडला नाही तर अर्शदीपची स्विंग गोलंदाजी आणखी घातक ठरू शकते.

केएल राहुल: दिल्ली कॅपिटल्सचा घातक फलंदाज केएल राहुलने गेल्या 10 डावांमध्ये 322 धावा केल्या आहेत. यादरम्यान, केएल राहुलने 145.59 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. केएल राहुलचे शानदार टायमिंग आणि क्लासिक शॉट्स सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने वळवू शकतात.

ट्रिस्टन स्टब्स: दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याचा इशारा आहे. एकदा ट्रिस्टन स्टब्स लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.

कुलदीप यादव: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवने गेल्या 9 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादवची अचूक आणि फिरकी गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, नेहल वढेरा, मिचेल ओवेन, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुस्तफिजुर रहमान आणि मुकेश कुमार.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL Axar Patel DC VS PBKS head-to-head DC vs PBKS IPL Match DC vs PBKS Live Score DC vs PBKS Live Scorecard DC vs PBKS Live Streaming DC vs PBKS Live Streaming in India DC vs PBKS Match Winner Prediction DC VS PBKS pitch report DC vs PBKS Score DC vs PBKS Scorecard DC vs PBKS Toss Prediction DC vs PBKS Toss Update DC vs PBKS Toss Winner Prediction Delhi Capitals Delhi Capitals Cricket Team Delhi Capitals Cricket Team vs Punjab Kings Cricket Team Delhi Capitals vs Punjab Kings Delhi Capitals vs Punjab Kings IPL Match Delhi Capitals vs Punjab Kings Live Score Delhi Capitals vs Punjab Kings Live Scorecard Delhi Capitals vs Punjab Kings Live Streaming Delhi Capitals vs Punjab Kings Live Streaming In India Delhi Capitals vs Punjab Kings Score Delhi Capitals vs Punjab Kings Scorecard Delhi vs Punjab Dharamsala Dharamsala Pitch Report Dharamsala Weather Himachal Pradesh Cricket Association Stadium Himachal Pradesh Cricket Association Stadium Pitch Report indian premier league Indian Premier League 2025 IPL IPL 2025 ipl news Jaipur Jaipur Pitch Report Jaipur Weather Jaipur weather report Jaipur Weather Update latest ipl news Punjab Punjab Kings Punjab Kings Cricket Team Punjab Kings vs Delhi Capitals Punjab Kings vs Delhi Capitals Live Match Scorecard Punjab Kings vs Delhi Capitals Pitch Report Punjab Kings vs Delhi Capitals Stats Sawai Mansingh Stadium Sawai Mansingh Stadium Pitch Report Shreyas Iyer Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL today's ipl match Where To Watch Delhi Capitals vs Punjab Kings आयपीएल आयपीएल २०२५ इंडियन प्रीमियर लीग ऋषभ पंत जयपूर जयपूर पिच रिपोर्ट जयपूर हवामान जयपूर हवामान अपडेट्स जयपूर हवामान रिपोर्ट टाटा २०२५ आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग धर्मशाला धर्मशाला पिच रिपोर्ट धर्मशाला हवामान पंजाब पंजाब किंग्ज लखनऊ विरुद्ध पंजाब लखनऊ सुपर जायंट्स श्रेयस अय्यर सवाई मानसिंग स्टेडियम हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement