MI-W vs RCB-W, Eliminator: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असणार 'या' दिग्गज खेळाडूंवर
त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.
MI-W vs RCB-W, Eliminator: आज म्हणजेच 15 मार्च रोजी महिला प्रीमियर लीगचा (Womens Premier League) एलिमिनेटर सामना खेळला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात होणार आहे. दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 17 मार्च रोजी होणार आहे. (हे देखील वाचा: MI-W vs RCB-W, Eliminator Live Streaming: फायनल खेळण्यासाठी मुंबई - बंगलोरमध्ये होणार चुरशीची लढत, जाणून घ्या केव्हा अन् कुठे पाहणार सामना)
सर्वांच्या नजरा असतील 'या' खेळाडूंवर
हरमनप्रीत कौर: हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक 235 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौर या सामन्यातही चांगली कामगिरी करू शकते.
अमेलिया केर: अमेलिया केर ही मुंबई इंडियन्स संघाची मुख्य अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत अमेलिया केरने अष्टपैलू कामगिरी करत 188 धावा केल्या आहेत आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत.
नॅट सायव्हर-ब्रंट: नॅट सायव्हर-ब्रंट मुंबई इंडियन्स संघासाठी या सामन्यात कहर करू शकते. आतापर्यंत नॅट सायव्हर-ब्रंटने 8 विकेट्स घेतल्या आहेत आणि 149 धावा केल्या आहेत.
स्मृती मानधना: स्मृती मानधना ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार आणि आघाडीची फलंदाज आहे. या स्पर्धेत आतापर्यंत स्मृती मानधनाने 8 सामन्यात 259 धावा केल्या आहेत. स्मृती मानधना या सामन्यातही चांगली कामगिरी करू शकते.
एलिस पेरी: अनुभवी अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने आतापर्यंत 51 च्या सरासरीने फलंदाजी करताना 246 धावा केल्या आहेत आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. आजच्या सामन्यातही एलिस पेरी बॉल आणि बॅटने कहर करू शकते.