IPL Auction 2025 Live

SRH vs KKR IPL 2023: हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज होणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा या बलाढ्य खेळाडूंवर

विशेषत: कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. आजच्या सामन्यातील पराभवाने कोलकात्याचे प्लेऑफमधील प्रवेशाचे दरवाजे जवळपास बंद होणार आहेत.

SRH vs KKR

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 47 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल. या दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषत: कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. आजच्या सामन्यातील पराभवाने कोलकात्याचे प्लेऑफमधील प्रवेशाचे दरवाजे जवळपास बंद होणार आहेत. अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, मयंक मार्कंडे यांच्या चमकदार कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून पराभव केला.

सनरायझर्स हैदराबाद 3 सामने जिंकून 6 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स 6 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

सर्वांच्या नजरा असतील या खेळाडूंवर 

आंद्रे रसेल

आंद्रे रसेल हा कोलकाता संघाचा स्फोटक फलंदाज आहे. मधल्या फळीत आंद्रे रसेल फलंदाजीला येतो. या स्पर्धेत आंद्रे रसेलने आतापर्यंत 142 धावा केल्या आहेत आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. (हे देखील वाचा: SRH vs KKR Preview: हैदराबाद आणि कोलकाता संघ प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उतरणार मैदानात, जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल आणि रेकॉर्ड)

रहमानउल्ला गुरबाज

रहमानउल्ला गुरबाजने गेल्या सामन्यात कोलकाताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. रहमानउल्ला गुरबाजने आपल्या संघासाठी 81 धावा केल्या, त्याने आतापर्यंत 8 सामन्यात 183 धावा केल्या आहेत. रहमानउल्ला गुरबाज या सामन्यातही वेगवान धावा करू शकतो.

वरुण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्ती हा कोलकाता संघाकडून आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. वरुण चक्रवर्तीने आपल्या संघाकडून 13 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यातही सर्वांच्या नजरा वरुण चक्रवर्तीवर असतील.

हेनरिक क्लासेन

या स्पर्धेत आतापर्यंत हेनरिक क्लासेनने 6 सामन्यात 153 धावा केल्या आहेत. हेनरिक क्लासेनने 51 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. तो खूप चांगल्या लयीत दिसत आहे, त्यामुळे या सामन्यातही तो ड्रीम टीममध्ये चांगला पर्याय असेल.

राहुल त्रिपाठी

सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत 170 धावा केल्या असून त्यात 74 धावांच्या उत्कृष्ट खेळीचा समावेश आहे. या सामन्यातही सनरायझर्स हैदराबादला राहुल त्रिपाठीकडून मोठ्या धावसंख्येची गरज आहे.

 

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन (कर्णधार), अब्दुल समद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक.

कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा.