USA Beat CAN: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेची मोठी कामगिरी, सामना जिंकून नावावर केला 'हा' मोठा हा विक्रम
अमेरिकेच्या संघाने कॅनडाचा 7 गडी राखून पराभव (USA Beat CAN) केला आहे. या सामन्यात अमेरिकेसाठी फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने (Monak Patel) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 अतिशय (T20 World Cup 2024) भव्य शैलीत सुरू झाला आहे. अमेरिकेच्या संघाने कॅनडाचा 7 गडी राखून पराभव (USA Beat CAN) केला आहे. या सामन्यात अमेरिकेसाठी फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने (Monak Patel) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅनडाच्या संघाने अमेरिकेला विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य दिले, जे ॲरॉन जोन्स आणि अँड्रेस गॉस यांच्यामुळे अमेरिकेने पूर्ण केले. टी-20 विश्वचषकात अमेरिकेच्या संघाचा हा पहिलाच सामना आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर अमेरिकन संघाने अनेक मोठे विक्रम केले आहेत.
अमेरिकेच्या संघाने केले हे विक्रम
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग अमेरिकेने केला आहे. याआधी अमेरिकेने टी-20 मध्ये 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तेव्हाही अमेरिकेने कॅनडाविरुद्ध हे लक्ष्य गाठले होते. टी-20 विश्वचषकात कोणत्याही संघाने पाठलाग केलेले हे तिसरे सर्वोच्च लक्ष्य आहे. टी-20 विश्वचषक 2016 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टी-20 विश्वचषकात कोणत्याही संघाने पाठलाग केलेले सर्वात मोठे लक्ष्य आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आयसीसीकडून 'वनडे प्लेयर ऑफ द इयर' 2023 या पुरस्काराने सन्मानित)
टी-20 विश्वचषकात सर्वात मोठ्या लक्ष्यांचा केला पाठलाग
230 धावा- इंग्लंड, 2016
206 धावा- दक्षिण आफ्रिका, 2007
195 धावा- अमेरिका, 2024
193 धावा- वेस्ट इंडिज, 2016
ॲरॉन जोन्स आणि अँड्रेस गॉस यांची अप्रतिम फलंदाजी
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. जेव्हा सलामीवीर स्टीव्हन टेलर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कर्णधार मोनांक पटेलही 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर ॲरॉन जोन्स आणि अँड्रेस गॉस यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोन खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिकेसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. ॲरॉन जोन्स आणि अँड्र्यूज यांच्यामुळेच अमेरिकन संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
टी-20 मध्ये अमेरिकेसाठी सर्वात मोठी भागीदारी
131 अँड्रिज गॉस - आरोन जोन्स, 2024
110 एस मोदानी - गजानंद सिंग, 2021
104 एम पटेल - एस टेलर, 2024
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)