All Squads for ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकासाठी सर्व 10 संघ जाहीर, भारत आणि ऑस्ट्रेलियाने केला प्रत्येकी एक बदल; एका क्लिकवर पहा संपूर्ण यादी
28 सप्टेंबर ही संघात बदल करण्याची शेवटची तारीख होती. आता कोणत्याही देशाला संघात बदल करण्यासाठी प्रथम आयसीसीची (ICC) परवानगी घ्यावी लागेल. गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी, दोन संघांनी त्यांच्या संघात प्रत्येकी एक बदल केला. यामध्ये भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघांचा समावेश आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) स्पर्धेसाठी सर्व 10 संघांनी त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 28 सप्टेंबर ही संघात बदल करण्याची शेवटची तारीख होती. आता कोणत्याही देशाला संघात बदल करण्यासाठी प्रथम आयसीसीची (ICC) परवानगी घ्यावी लागेल. गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी, दोन संघांनी त्यांच्या संघात प्रत्येकी एक बदल केला. यामध्ये भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अष्टपैलू अॅश्टन अगरच्या जागी फलंदाज मार्नस लॅबुशेनचा समावेश केला आहे आणि भारताने जखमी अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन ( Ravichandra Ashwin) अश्विनचा संघात समावेश केला आहे.
वेस्ट इंडिज विश्वचषक खेळणार नाही
यंदाच्या विश्वचषकात एकूण 10 संघ खेळणार आहेत. 1975 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर 48 वर्षांमध्ये ही पहिलीच वेळ असेल, की वेस्ट इंडिज विश्वचषक खेळणार नाही. विंडीजचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, भारतात 10 मैदानांवर 48 सामने खेळवले जातील. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023 Warm-Up Match Schedule: सराव सामन्यात 10 संंघ भिडण्यासाठी तयार, वेळापत्रक, वेळ, ठिकाण यासह प्रत्येक तपशील घ्या जाणून)
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी सर्व संघाची पहा यादी
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर. अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
अफगाणिस्तान संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
बांगलादेश संघ: शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, लिटन दास (उपकर्णधार), नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदयॉय, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, महेदी हसन, तन्जीद हसन, तनजीद हसन. तंजीम हसन, महमुदुल्लाह
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
नेदरलँड्स संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी, साकीब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल तरुण .
पाकिस्तान संघ: फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली.
दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जोसन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सेन, कागिसो रबाडा.
श्रीलंकेचा संघ: दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महिष थेक्षाना, दुनिथ वेलिताना, राजुथ वेलिताना, महिष थिक्षाना, राजकुमार काका, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)