Ajit Agarkar on Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीवर अजित आगरकरने पहिल्यांदाच मौन सोडले, म्हणाला....

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, शुभमन गिल (Shubman Gill) आता टीम इंडियाचा नवा कर्णधार बनला आहे. अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली आहे. त्याचवेळी, आगरकरने विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत (Virat Kohli Test Retirement) आपले मौनही सोडले आहे.

Ajit Agarkar (Photo Credit - Twitter)

India Test Squad For England Tour: आयपीएल 2025 नंतर, टीम इंडिया जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ज्याबाबत आज टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, शुभमन गिल (Shubman Gill) आता टीम इंडियाचा नवा कर्णधार बनला आहे. अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली आहे. त्याचवेळी, आगरकरने विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत (Virat Kohli Test Retirement) आपले मौनही सोडले आहे.

विराटच्या निवृत्तीबद्दल काय म्हणाले आगरकर ?

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने 12 मे रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहलीच्या निवृत्तीने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत अजित आगरकर म्हणाले, "विराटने एप्रिलच्या सुरुवातीला आमच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो आमच्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा खेळाडू होता आणि त्याची जागा घेणे इतके सोपे होणार नाही."

इंग्लंडविरुद्धची मालिका एक मोठे आव्हान

अजित आगरकर म्हणाले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने "हा एक मोठा बदल आहे". इंग्लंडविरुद्धची मालिका एक मोठे आव्हान असेल आणि गिलला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेशा संधी मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement