Aaron Finch Test Career: कसोटी कारकिर्द संपल्याची ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने दिली कबूली, 2023 मध्ये वनडे क्रिकेटलाही करणार बाय-बाय
पुढील तीन वर्षांत तीन मर्यादित ओव्हरच्या वर्ल्ड कप स्पर्धांमुळे त्याच्याकडे टेस्ट संघात दावा करण्यासाठी थोडा वेळ शिल्लक आहे असेही तो म्हणाला.
प्रतिभावान तरूण खेळाडूंचा उदय झाल्यामुळे त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याची फारशी शक्यता नसल्याची कबुली ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) दिली. पुढील तीन वर्षांत तीन मर्यादित ओव्हरच्या वर्ल्ड कप स्पर्धांमुळे त्याच्याकडे टेस्ट संघात दावा करण्यासाठी थोडा वेळ शिल्लक आहे असेही तो म्हणाला. 2018 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये फिंचने कसोटी सामन्यात (Finch Test Debut) पदार्पण केले होते. सलामी फलंदाज डेविड वॉर्नरवर (David Warner) बॉल टेंपरिंग प्रकरणात बंदी घातल्यामुळे त्याच्या जागी फिंचला संधी देण्यात आली होती. त्यावर्षी फिंच बॉक्सिंग डे स्पर्धेतील शेवटच्या पाच कसोटी सामन्यांत भारतविरुद्ध पूर्वी खेळला होता आणि त्यानंतर त्याने फक्त पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. "रेड बॉल क्रिकेटच्या बाबतीत, पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणे वास्तववादी आहे असे मला वाटत नाही," क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Cricket Australia) संकेतस्थळाला फिंचने सांगितले. (Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलियाचा वनडे व टी-20 कर्णधार आरोन फिंचची घोषणा, 2023 वर्ल्ड कप फायनलसह करिअर संपवण्याच्या आहे विचारात)
“फक्त दोन गोष्टींवर आधारित: चार-दिवसीय क्रिकेट खेळण्याची आणि दावा करण्याची सक्ती करण्याची संधी खरोखरच मर्यादित होईल; आणि ऑस्ट्रेलियामध्येही काही गंभीर खेळाडू आहेत, विशेषतः टॉप-ऑर्डर फलंदाज. प्रतिभावान सखोलता या क्षणी खरोखर बळकट आहे म्हणून मला प्रामाणिकपणे संधी असल्याचे वाटत नाही,” 33 वर्षीय फलंदाजाने सांगितले. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी फिंचने 2023 भारतात आयोजित होणाऱ्या वर्ल्ड कपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचही जाहीर केलं होतं, पण सध्या तो आयोजित होणाऱ्या सलग दोन टी-20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करत आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या तीन टी-20 आणि वनडे सामन्यानाच्या मालिकेसाठी फिंच ऑस्ट्रेलिया टीमसह इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. 4 ते 16 सप्टेंबर दरम्यान इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये मर्यादित ओव्हरची मालिका खेळली जाईल. मार्चपासून स्थगित झालेलं आंतराष्ट्रीय क्रिकेट इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेपासून सुरु झाले. मार्च महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचीही पहिली मालिका असणार आहे.