आपल्या कारकीर्दीची दमदार सुरूवात करणारे 'हे' 5 क्रिकेटपटू आज कुठे आहेत? घ्या जाणून
परंतु, आंतराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी घरेलू मैदानावर चांगली कामगिरी करून दाखवणे अधिक गरजेचे असते.
देशांतर्गत क्रिकेट खेळणारा प्रत्येक खेळाडू आंतराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतो. परंतु, आंतराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी घरेलू मैदानावर चांगली कामगिरी करून दाखवणे अधिक गरजेचे असते. हे अनेक खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे. महत्वाचे म्हणजे, आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवलेल्या खेळाडूचे संघाच्या अकरामध्ये स्थान कायम असेल, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. दरम्यान, संघातील अनुभवी खेळाडूंच्या अस्तिवामुळे काही जण डावलले जातात. तर, काही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर पडतात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या कारकिर्दीची दिमाखदार सुरुवात केली. परंतु, काही काळानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जागा मिळवण्यात अपयश आले आहे.
एका वेबसाईटने पाच क्रिकेटपटूंची माहिती दिली आहे. ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दिमाखदार केली होती. परंतु, काही काळानंतर खराब कामगिरीमुळे त्यांना संघातून डावलले गेले आहे. या यादीत इंग्लंडचा हसीब हमीद, भारतीय संघाचे जोगिंदर शर्मा आणि जयंत यादव, ऑस्ट्रेलिया संघाचे स्टीव्ह ओ किफ आणि फिल जॅक यांचा समावेश आहेत. हे देखील वाचा- युवराज सिंह याच्याप्रमाणे Team India साठी ‘हे’ 5 खेळाडू बनू शकतात नवीन फिनिशर, बलाढ्य संघापुढे दाखवला आहे दम
हसीब हमीद-
हसीब हमीद हा इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे. दरम्यान, स्पिन गोलंदाजीविरुद्ध त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर इंग्लंड किक्रेट संघाच्या निवडकर्त्यांनी त्याची 2016 मध्ये भारतीय दौऱ्यासाठी निवड केली होती. त्यावेळी त्याला मिळालेल्या संधीचे सोन करत त्याने भारतीय फिरकीपटूंची चांगली शाळा घेतली होती. 19 वर्षाच्या युवा फलंदाजाने आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले. परंतु, दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर जावा लागले. त्यानंतर तो पुन्हा कधीच संघात परतला नाही. हसीब हमीदने त्याच्या कारकिर्दीत केवळ सहा डाव खेळून 43.80 च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत.
जोगिंदर शर्मा-
पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अखेर चेंडू टाकून भारताला विजय मिळवून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्माला कधीच विसरता येणार नाही. पहिल्या विश्वचषकामध्ये भारताकडून उत्कृष्ट कामगिरी करणारा जोगिंदर शर्मा संपूर्ण देशासाठी नायक ठरला होता. परंतु, जोहान्सबर्ग येथे मिसबाह-उल- हक याला बाद केलेला चेंडू त्याच्या करिअरचा अखेरचा चेंडू ठरला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान दुखापतग्रस्त झाल्यामुळे जोगिंदर शर्माला संधी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघाच्या अकरामध्ये स्थान मिळाले नाही.
स्टीव्ह ओ’किफ
स्टीव्ह ओ’किफ हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे. त्याला 2017 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने चांगली कामगिरी बजावून दाखवली होती. मात्र, त्यानंतर बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या मालिकेत त्याने निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळाले नाही. सध्या तो 35 वर्षाचा असून बिग बॅश लीगमध्ये न्यू साऊथ वेल्स क्रिकेट संघाचा सदस्य आहे.
जस्टिन लॅंगर्स
जस्टिन लॅंगर्स हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा जस्टन लॅंगर्सची ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली होती. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोजके सामने खेळणारा जस्टीन लॅंगर्स दुखापतीमुळे संघाबाहेर जावा लागले. त्यानंतर काही काळानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.