Cheteshwar Pujara Reveals Shocking Story: 'मला मारहाण केली'; पुजाराने वेस्ट इंडिजमध्ये त्याच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली, रोहित शर्माचा ही दिली होती ताकीद (Video)

चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजारा यांच्या 'द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान रोहित शर्माने वेल्ट इंडिजमधल्या एका मजेदार गोष्टीचा खुलासा केला आहे.

Photo Credit- X

Cheteshwar Pujara Reveals Shocking Story: चेतेश्वर पुजाराने इंडिया अ च्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यादरम्यान त्याला मारहाण झाल्याची धक्कादायक कहाणी शेअर केली. चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) पत्नी पूजा पुजाराने लिहिलेल्या 'डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान या घटनेचा उलगडा झाला. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) चेतेश्वर पुजाराला 2012 मध्ये भारत अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान काय घडले याची कहाणी सांगण्यास सांगितले. रोहित शर्माने त्याला कहाणी सांगण्यास सांगितले तेव्हा चेतेश्वर पुजाराने सांगितले, "मी शाकाहारी आहे, म्हणून आम्ही रात्री शाकाहारी जेवण शोधत होतो आणि तो टीएनटीमध्ये रात्री 11 वाजता बाहेर गेला होता. आम्हाला जेवण सापडले नाही पण जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा मला एका जमावाने मारहाण केली."असे तो म्हणाला. त्यावर रोहित शर्मा म्हणाला की. "कधीकधी तो हट्टी होतो. आम्ही त्याला सांगितले, आम्ही त्याला इशारा दिला, रात्री 9 नंतर बाहेर जाऊ नको, तरी तो गेला".

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement