Australia Beat Scotland, 3rd T20I Scorecard: तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून विजय, स्कॉटलंडचा 3-0 असा केला क्लीन स्वीप

स्कॉटलंडची कमान रिची बेरिंग्टनच्या खांद्यावर होती. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करत होते. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

AUS Team (Photo Credit - X)

Australia National Cricket Team Beat Scotland National Cricket Team Scorecard: स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (Scotland National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना एडिनबर्ग येथील ग्रँज क्रिकेट क्लबमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा सहा गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा क्लीन स्वीप करत तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी खिशात घातली. स्कॉटलंडची कमान रिची बेरिंग्टनच्या खांद्यावर होती. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करत होते. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तत्पूर्वी, तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 18 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. यानंतर जॉर्ज मुन्से आणि ब्रँडन मॅकमुलेन यांनी मिळून डाव सांभाळला.

जॉर्ज मुनसे आणि ब्रँडन मॅकमुलेन यांच्याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही. स्कॉटलंड संघाने निर्धारित 20 षटकात नऊ गडी गमावून 149 धावा केल्या. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक 56 धावांची खेळी खेळली. आपल्या स्फोटक खेळीदरम्यान ब्रँडन मॅकमुलेनने तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. ब्रँडन मॅकमुलेनशिवाय जॉर्ज मुन्सीने 25 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक तीन बळी घेतले. कॅमेरून ग्रीनशिवाय ॲरॉन हार्डी आणि सीन ॲबॉटने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 150 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पुन्हा एकदा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले.

पहिल्या टी-20 सामन्यात 80 धावा करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला शेवटच्या सामन्यातही केवळ 12 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन संघाने 16.1 षटकांत चार विकेट गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरून ग्रीनने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही कहर केला. कॅमेरून ग्रीनने 39 चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 62 धावांची शानदार खेळी केली. कॅमेरून ग्रीनशिवाय कर्णधार मिचेल मार्शने 31 धावा केल्या. स्कॉटलंडकडून ब्रॅडली करीने सर्वाधिक दोन बळी घेतले. ब्रॅडली करीशिवाय जॅक जार्विस आणि क्रिस्टोफर सोल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif