Coronavirus: चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना, जागतिक स्पर्धेतील दिग्गज खेळाडूचा धक्कादायक दावा

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनच्या वुहान शहरात जागतिक मिलिटरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात 100 देशातील 10 हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी काही खेळाडू आजारी पडले आणि काही कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.

Coronavirus In India | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. आजवर 48 लाख हुन अधिकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे तर 3 लाख पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रसार चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरातून झाला असला तरी तो कधी आणि केव्हा पसरला या बद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. कोरोनाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या वुहानच्या लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप अनेक देशांनी केला. चीननेही हा व्हायरस नोव्हेंबरमध्ये पसरला असल्याचे मान्य केले, पण फ्रान्सच्या जागतिक दर्जाची खेळाडू एलोडीए क्लोउव्हेलने (Elodie Clouvel) एका धक्कादायक खुलाश्यात म्हटले हा व्हायरस चिनी देशात ऑक्टोबरमधेच पसरला होता. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनच्या वुहान शहरात जागतिक मिलिटरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात 100 देशातील 10 हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी काही खेळाडू आजारी पडले आणि काही कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. (Coronavirus चा जन्म झालेल्या चीनमध्ये गेल्या एक महिन्यात कोरोना व्हायरसमुळे एकही मृत्यू नाही)

31 वर्षीय फ्रेंच पेंटॅथलीट क्लोउव्हेल आणि तिचा बॉयफ्रेंण्ड व्हॅलेंटीन बेलौड यांना खेळांच्या दरम्यान कोविड-19 का संसर्ग झाला. शिवाय, इटालियन फेंसर टॅग्लियारॉलने हे उघड केले की त्याच्या वुहान अपार्टमेंटमधील प्रत्येकजण 'कोविड-19 सारख्या लक्षणांमुळे आजारी पडले आणि नंतर त्याचा मुलगा आणि गर्लफ्रेंडलाही याची लागण झाली. या खुलाशानंतर, जर्मन व्हॉलीबॉल संघातील खेळाडू जॅकलिन बॉक म्हणाली की तिला आणि तिच्या सहका्यांना ऑक्टोबरमध्ये झालेल्या कार्यक्रमात विषाणूचा संसर्ग झाला होता.

चीनमध्ये पहिल्या कोरोना रुग्णाची पुष्टीडिसेंबरच्या सुरूवातीस केली गेली होती परंतु खेळां दरम्यान वुहानचे रस्ते जवळजवळ रिकामे होते असा दावा लक्समबर्ग ट्रायलेट ऑलिवर जॉर्जेसने केला. "भुतांच्या शहरात आलो की काय असे वाटत होते. रहिवाशांना बाहेर जाऊ नये असा इशारा सरकारने दिला अशी अफवा होती." चीननेजानेवारीत हा रोग पसरल्याचे कबूल केले असले तरी वुहानमध्ये स्वच्छताविषयक उपाय योजण्यात आल्याचे वर्ल्ड मिलिटरी गेम्समधील अनेक खेळाडूंनी सांगितले.