Coronavirus लॉकडाउन काळात रॅपर डीजे ब्रावो ने बनवले गाणे ऐकून व्हाल इम्प्रेस, पाहा Video
नवीन गाण्यात, 36 वर्षांया ब्रावो परिस्थिती सध्या ‘किती वाईट’ आहे याबद्दल बोलला आणि ‘वेड’ लवकरात लवकर थांबावे अशी त्याची इच्छा आहे.
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्व काही ठप्प झाले आहे. जगभरातील लोकांना याचा त्रास होऊ नये म्हणून घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. खेळ, मनोरंजन, व्यवसाय सर्व काही बंद पडले आहे. या आजारामुळे सुमारे 27,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पाच लाखाहून अधिक लोकांना या व्हायरसचे निदान झाले आहे. या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजच्या करिश्माई अष्टपैलू ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) जगातील सर्व लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी आपले नवीन गाणे ‘नॉट गिव्हिंग अप’ (Not Giving Up) लॉन्च केले. जगभरातील क्रिकेटींग इव्हेंट्स रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्याने सध्या सर्व खेळाडू आपल्या घरीच बसले आहेत. विश्वभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Fox Cricket ने ऑस्ट्रेलियाच्या 2023 वर्ल्ड कप संभाव्य प्लेयिंग XI लिस्टमधून आरोन फिंच ला वगळले, डेविड वॉर्नर ने व्यक्त केली निराशा)
नवीन गाण्यात, 36 वर्षांया ब्रावो परिस्थिती सध्या ‘किती वाईट’ आहे याबद्दल बोलला आणि ‘वेड’ लवकरात लवकर थांबावे अशी त्याची इच्छा आहे. या बरोबरच, ब्रावोने आपल्या चाहत्यांना निरोगी राहण्यासाठी नियमितपणे हात धुणे आणि सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणे यासारखी योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकट ओढवेल याविषयी कॅरिबियन स्टार नक्कीच आशावादी आहे आणि आपल्या चाहत्यांनाही एक सकारात्मक संदेश देत आहे. ब्रावोने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. "साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्याने, तेथील सर्वांसाठी माझी मनःपूर्वक प्रार्थना! या उद्रेका दरम्यान एकत्र सकारात्मक लढा देऊ!" असे कॅप्शन ब्रावोने दिले.
दरम्यान, वर्ष 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ब्रावोने मागील वर्षी टी-20 मध्ये पुनरागमनाची घोषणा केली. यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. मात्र, जगभरातील सर्व आगामी क्रीडा स्पर्धांप्रमाणेच टी-20 स्पर्धेच्या आयोजनावर्षी संकट आहे आणि यंदा कोरोनामुळे आयपीएल 2020 रद्द होईल असे मानले जात आहे.