T20 World Cup 2024: T-20 विश्वचषक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा भावूक; केन्सिंग्टन ओव्हल स्टेडीयममधील चक्क गवतच खाल्ले, आयसीसीकडून व्हिडीओ शेअर (Watch Video)
त्याचे डोळे स्टेडियममध्ये पाणावले होते. भावनेच्या भरात स्टेडियममध्ये खेळपट्टीवर असलेले गवत, माती खाताना तो दिसला.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना (IND vs SA T20 World Cup 2024 Final) बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झालेला पहायला मिळाला त्याचे डोळे स्टेडियममध्ये पाणावलेले पहायला मिळाले. भावनेच्या भरात त्याने स्टेडियममध्ये खेळपट्टीवर असलेले गवत, माती खाताना तो दिसला. (हेही वाचा: Virat Kohli Emotional: भारताच्या शानदार विजयानंतर विराट कोहली झाला भावूक, मैदानावर डोळे पाणावले - Video)
आयसीसीने रविवारी रोहितचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात कर्णधार पीचवर दाखवला होता. व्हिडीओ जसजसा पुढे जातो. तसे रोहीत पीचवरील गवत, माती खाताना दिसतो. तसेच तेथून निघण्यापूर्वी त्याने पिचवर थाप दिली आणि मानवंदना करून तेथून निघून गेला.
व्हिडीओ पहा-
रोहित शर्मा दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू
टीम इंडियाने 2007 मध्ये पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर संघाची कमान एमएस धोनीच्या हातात होती. त्यानंतर भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा रोहित शर्माही त्या संघाचा सदस्य होता. तेव्हापासून आतापर्यंत रोहित शर्मा प्रत्येक टी-20 विश्वचषक खेळला आहे. टी-20 विश्वचषक दोनदा जिंकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी तो केवळ खेळाडू म्हणून खेळला होता, मात्र यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकला आहे.