ICC Cricket World Cup 2019: यावर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लागू झाले 7 नवे नियम; खेळाडूंंच्या अडचणी वाढल्या
सोबत इतर 7 नवे नियमही लागू करण्यात आले आहेत. हे सर्व नियम आधी वनडे क्रिकेटमध्ये लागू करण्यात आले होते, आता ते वर्ल्डकपसाठीही लागू करण्यात येणार आहेत. जाणून घ्या काय आहेत हे नियम
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे (ICC Cricket World Cup 2019) हे 12 वे पर्व, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरु होत आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या युद्धामध्ये 10 संघ सामील होत आहेत. यावर्षी या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल घडला आहे, राउंड रॉबिन स्वरूपात प्रत्येक संघाला नऊ सामने खेळणे आवश्यक आहे. सोबत इतर 7 नवे नियमही लागू करण्यात आले आहेत. हे सर्व नियम आधी वनडे क्रिकेटमध्ये लागू करण्यात आले होते, आता ते वर्ल्डकपसाठीही लागू करण्यात येणार आहेत. जाणून घ्या काय आहेत हे नियम
- जर फलंदाजाने मारलेला चेंडू कोणत्या क्षेत्ररक्षकाच्या हेलमेटला लागून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने तो पकडला तर फलंदाज बाद ठरणार आहे. परंतु हँडल द बॉलच्या स्थितीत फलंदाज बाद ठरणार नाही.
- कोणत्याही खेळाडूचे वर्तन पंचांना दोषी आढळले तर, आयपीएल आचारसंहितेच्या कलम 1.3 अन्वये त्या खेळाडूला मॅचमधून बाहेर काढण्याचा अधिकार पंचांना असेल.
- जर फलंदाज किंवा क्षेत्ररक्षण संघाने डीआरएस घेतला आणि अंपायर्स कॉलमुळे पंचांचा निर्णय अंतिम राहिला तर संघाचा रिव्ह्यू खराब राहणार नाही.
- सामान्यादरम्यान गोलंदाजाने फेकलेल्या बॉल, दोन बाऊन्ससह फलंदाजापर्यंत पोहचला तर तो ‘नो बॉल’ ठरणार आहे. आधी नो बॉल देण्याचा कोणताही नियम नव्हता, तसेच नो बॉलवर फलंदाजांनाही फ्री-हिट मिळते. (हेही वाचा: लोरिन आणि रूडिमेंटल या बँडने साकारलेलं 'वर्ल्ड कप'चं खास एंथम साँग (Watch Video))
- आधी स्टंपिंगच्या बाबतीत बॅट रेषेवर असल्यास नॉट आउट दिला जायचा. परंतु आता ऑन द लाइन बॅट असेल तर तो आउट मानला जाईल. जर बॅट किंवा फलंदाजांचा पाय क्रीजच्या आत असेल आणि तो हवेत असेल तर फलंदाज नॉट आउट असेल.
- बॉलशी बॅटचा आकार संतुलित ठेवण्यासाठी बॅटचा आकार निश्चित केला गेला आहे. बॅटची रुंदी 108 मिमी जाड, 67 मिमी व्यास आणि कोपऱ्यांवर जास्तीत जास्त 40 मिमी असेल. याबाबत कसलाही संशय आल्यास अंपायर बॅटचा आकार मोजू शकतो.
- यापूर्वी, जर एखाद्या गोलंदाजाने बॉल टाकला तर बाय किंवा लेग बायने केलेल्या धावा नो बॉलमध्ये जोडल्या जायच्या. पण आता तसे होणार नाही. नो बॉलच्या धावा वेगळ्या असतील आणि बाय-लेग-बाय च्या धावा वेगळ्या असतील.
दरम्यान भारतीय संघ विश्वचषकासाठी रवाना झाला आहे. जाण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या पत्रकारपरिषदमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 साठी भारतीय खेळाडूंनी जय्यद तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर संघातील सर्व खेळाडू हे पूर्णपणे फॉर्ममध्ये आहेत असेही विराट कोहली आणि रविशास्त्री यांनी सांगितले.