Zimbabwe Plane Crash: झिम्बाब्वेमध्ये भीषण विमान अपघात; भारतीय अब्जाधीश Harpal Randhawa आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू

'रिओझिम'च्या मालकीचे सेसना 206 (Cessna 206) विमान शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 रोजी हरारेहून (Harare) मुरोवा (Murowa) हिऱ्याच्या खाणीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला.

Zimbabwe Plane Crash (Photo Credits: X)

झिम्बाब्वेस्थित (Zimbabwe) भारतीय अब्जाधीश उद्योगपती हरपाल रंधवा (Harpal Randhawa) आणि त्यांचा मुलगा आमेर कबीर सिंग रंधावा यांचा खाजगी विमान अपघातात दुःखद मृत्यू झाला. दक्षिण-पश्चिम झिम्बाब्वेमधील हिऱ्याच्या खाणीजवळ एका खासगी विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, ज्यामध्ये भारतीय खाण व्यावसायिक आणि त्याच्या मुलासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. 'आयहरारे' या न्यूज वेबसाइटने आपल्या बातमीत म्हटले आहे की, मशावा येथील जवाम्हंडे भागात झालेल्या विमान अपघातात 'रिओझिम' (RioZim) खाण कंपनीचे मालक हरपाल रंधवा, त्यांचा मुलगा आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला. रिओझिम ही सोने आणि कोळसा तसेच निकेल आणि तांबे यांचे शुद्धीकरण करणारी प्रमुख खाण कंपनी आहे.

अहवालानुसार, 'रिओझिम' च्या मालकीचे सेसना 206 (Cessna 206) विमान शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 रोजी हरारेहून (Harare) मुरोवा (Murowa) हिऱ्याच्या खाणीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. सिंगल-इंजिन विमान मुरोवा हिऱ्याच्या खाणीजवळ क्रॅश झाले. जवाम्हंडे येथील पीटर फार्ममध्ये पडण्यापूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे त्याचा हवेत स्फोट झाला असावा. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 'द हेराल्ड' वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अपघातात ठार झालेले चार जण परदेशी होते, तर इतर दोघे झिम्बाब्वेचे नागरिक होते. (हेही वाचा: Fighting Couple Video: भांडण करताना जोडपे तिसऱ्या मजल्यावरून पडले, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now