US Government Agencies Hit by Cyberattack: अनेक यूएस फेडरल सरकारी संस्थांना जागतिक सायबर हल्ल्याचा फटका; प्रभाव समजून घेण्यासाठी CISA करत आहे काम
या सायबर हल्ल्यामध्ये प्रभावित सॉफ्टवेअरचे नाव किंवा कथित असुरक्षिततेबाबत इतर कोणतेही तपशील समोर येऊ शकले नाहीत.
अनेक यूएस फेडरल सरकारी एजन्सींना जागतिक सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. हॅकर्सद्वारे असुरक्षित सॉफ्टवेअरवर परिणाम झालेल्या अनेक फेडरल एजन्सींना यूएस सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी (CISA) सहाय्य प्रदान करत आहे. तसेच सीआयएसए हा हल्ल्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी तातडीने काम करत आहे. एरिक गोल्डस्टीन, सायबर सिक्युरिटीसाठी एजन्सीचे कार्यकारी सहाय्यक संचालक, यांनी सीएनएनला याबाबत माहिती दिली. या सायबर हल्ल्यामध्ये प्रभावित सॉफ्टवेअरचे नाव किंवा कथित असुरक्षिततेबाबत इतर कोणतेही तपशील समोर येऊ शकले नाहीत. फेडरल एजन्सींच्या सुरक्षेच्या उल्लंघनासाठी जबाबदार असलेले हॅकर्स हे रशियन-भाषी रॅन्समवेअर गट असल्याची शक्यता वर्तवली आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झाली नाही. (हेही वाचा: India Ranks 1st in Digital Payments: डिजिटल पेमेंटमध्ये भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर; 2022 मध्ये 89.5 दशलक्ष व्यवहारांची नोंद)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)