Plane Crashes in Brazil’s Sao Paulo: ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये भीषण अपघात; 62 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले (Watch Video)
मात्र या विमानात 62 लोक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये विमान वेगाने खाली जाताना दिसत आहे.
Plane Crash in Brazil’s Sao Paulo: ब्राझीलमधील साओ पाउलो येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे. साओ पाउलो राज्यात एक प्रवासी विमान कोसळले आहे. या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या विमानात 62 लोक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये विमान वेगाने खाली जाताना दिसत आहे. अपघातानंतर ताबडतोब मदत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलच्या प्रादेशिक एअरलाइन VoePass चे विमान 2283-PS-VPB शहराच्या निवासी भागात शुक्रवारी क्रॅश झाले. हे विमान साओ पाउलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ ग्वारुलहोसकडे जात होप्ते. अपघात कशामुळे झाला हे निवेदनात सांगण्यात आलेले नाही. अग्निशमन दलाने विमान विन्हेडो शहरात पडल्याची पुष्टी केली. (हेही वाचा; Earthquake in Japan: टोकियो आणि आसपासच्या भागात 5.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)