Nude Wedding Ceremony: ऐकावे ते नवलंच! जमैकामध्ये पार पडला नग्न विवाहसोहळा; तब्बल 29 जोडप्यांनी कपड्यांशिवाय बांधली लग्नगाठ
वधू-वर, पाहुणे अशा कोणाच्याही अंगावर कपडे नव्हते.
Nude Wedding Ceremony: जगात अशी अनेक लग्ने झाली आहेत, जी विविध कारणांमुळे चर्चेत आली आहेत. आता जमैकामधील एका लग्नसोहळ्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल होत अआहे. त्यामागचे कारण म्हणजे या लग्नात लोक विना कपडे म्हणजे नग्नावस्थेत पोहोचले होते. काही वर्षांपूर्वी जमैकामधील एका रिसॉर्टमध्ये असे लग्न झाले होते, ज्यामध्ये प्रत्येकजण कपड्यांशिवाय पोहोचला होता. वधू-वर, पाहुणे अशा कोणाच्याही अंगावर कपडे नव्हते. या अनोख्या विवाह सोहळ्यात एक-दोन जोडप्यांनी नव्हे तर 29 जोडप्यांनी नग्न अवस्थेत लग्न केले होते. हा नग्न विवाह सोहळा 2003 मध्ये झाला होता, मात्र इतक्या वर्षांनंतरही ही लग्ने चर्चेत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पार पडलेल्या या लग्नात हॉटेलजवळील समुद्रकिनारी असलेल्या लॉनमध्ये सर्व जोडपी नग्न झाली होती. याआधी आणि नंतरही या रिसॉर्टमध्ये असे नग्न विवाह झाले आहेत. पण 2003 मध्ये जोडप्यांची संख्या सर्वाधिक होती. यानंतर 2012 मध्ये झालेल्या अशाच एका समारंभात 9 जोडप्यांनी विना कपड्यांत लग्न केले होते. (हेही वाचा: Kubra Aykut Dies by Suicide: स्वतःशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय तुर्किश टिकटॉक स्टार कुब्रा आयकुटने केली आत्महत्या; 5 व्या मजल्यावरून मारली उडी
Nude Wedding Ceremony:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)