IPL Auction 2025 Live

Nepal Same-Sex Marriage: नेपाळ सुप्रीम कोर्टाने सरकारला समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याचे दिले आदेश

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानेही सरकारने नेपाळी नागरिकाच्या समलिंगी परदेशी जोडीदाराला मान्यता देणे आवश्यक आहे असा निर्णय दिला आहे.

Same-Sex Marriage (संग्रहित संपादित प्रतिमा)

सुप्रीम कोर्ट ऑफ नेपाल कडून सेम सेक्स मॅरेज अर्थात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानेही सरकारने नेपाळी नागरिकाच्या समलिंगी परदेशी जोडीदाराला मान्यता देणे आवश्यक आहे असा निर्णय दिला आहे. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर (LGBT) लोकांच्या अधिकारांना मान्यता देणार्‍या 2007 आणि 2017 मधील निर्णयांवर आधारित, सर्वोच्च न्यायालयाने असे आढळले की समलिंगी विवाहाला मान्यता न देणं हे नेपाळच्या संविधानाचे आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दायित्वांचे उल्लंघन करणारं असेल असे ते म्हणाले. Same Sex Marriage: समलिंगी विवाहास केंद्राचा विरोध; पती, पत्नी, मुले आणि भारतीय कुटुंब संकल्पनेचा दिला दाखला .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)