Nepal: उड्डाण घेतल्यानंतर Fly Dubai विमानाच्या इंजिनला आग; परिस्थिती नियंत्रणात, विमान दुबईकडे रवाना

फ्लाइट FZ576 ने रात्री 9:21 वाजता विमानतळावरून उड्डाण केले आणि रात्री 9.25 च्या सुमारास विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसले.

Fly Dubai Aircraft (Photo Credit: Wikimedia Commons)

नेपाळमधून  एक मोठी बातमी समोर येत आहे. काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेत असताना फ्लाय दुबईच्या विमानाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच काठमांडू विमानतळावर विमान उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वेळाने नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांनी दुबईला जाणाऱ्या विमानात आता सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. विमान दुबईला रवाना झाले आहे. काठमांडूहून दुबईला जाणाऱ्या बोईंग 737 विमानात आग लागल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, विमानात 169 प्रवासी होते. फ्लाइट FZ576 ने रात्री 9:21 वाजता विमानतळावरून उड्डाण केले आणि रात्री 9.25 च्या सुमारास विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसले. त्यानंतर समस्येचे निराकरण झाल्यानंतर विमान दुबईकडे रवाना झाले. (हेही वाचा: American Airlines Passenger Urinating Case: अमेरिकन एअरलाइन्सच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये भारतीय व्यक्तीने सहप्रवाशावर केली लघवी; आरोपीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now