Germany Legalises Marijuana: जर्मनी मध्ये 1 एप्रिल पासून गांजा ओढण्याला कायदेशीर परवानगी; पहा नवा नियम काय सांगतो

जर्मनीत गांज्याला कायदेशीर परवानगी दिली तरी 7:00 ते 20:00 दरम्यान शाळा, क्रीडा केंद्रे किंवा "पादचारी रस्ता" मध्ये गांजा ओढण्यास मनाई आहे.

Ganja File Image

आज 1 एप्रिलपासून जर्मनी मध्ये कायदेशीररित्या गांजा ओढता येणार आहे. 1 एप्रिलपासून गांजाला कायदेशीर बनवणारा नवीन कायदा लागू होत आहे. तसेच कोणालाही घरी त्याची तीन रोपे लावण्याची देखील परवानगी आहे. या मान्यतेनंतर आता जर्मनी अशा काही राष्ट्रांपैकी एक बनला आहे ज्यांनी गांजाला कायदेशीर मान्यता दिली आहे. शिवाय, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी 25 ग्रॅम पर्यंत गांजा ठेवू शकतात. पण लोकांना 7:00 ते 20:00 दरम्यान शाळा, क्रीडा केंद्रे किंवा "पादचारी रस्ता" मध्ये गांजा ओढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

पहा ट्वीट