हैदराबाद (Hyderabad) येथे अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी तिच्या घरात सामूहिक बलात्कार (Hyderabad Gang Rape) केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी पीडितेला तातडीने मदत करुन तिला वैद्यकीय तपासणीसाठी सखी केंद्रात पाठवले आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडितेच्या घरीच जाऊन हे कृत्य केले. ही घटना रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या मीरपेट पोलीस (Hyderabad Police) ठाण्याच्या हद्दीतील नंदनवनम कॉलनीत सोमवारी (21 ऑगस्ट) घडली. पीडितेच्या घरात घुसलेल्या आरोपींनी तिचा भाऊ आणि इतर तीन मुलांना धमकावून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आठ तरुणांचा एक गट घरात घुसला. त्यापैकी चार आरोपींनी पीडितेला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेले. उरलेल्यांनी तिचा भाऊ आणि घरात उपस्थित असलेल्या इतर तीन मुलांना धमकावले. आरोपींनी पीडितेला वरच्या मजल्यावर घेऊन गेलेल्या चार आरोपींपैकी तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर ते पळून गेले. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सखी केंद्रात पाठवले.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत. गुन्हेगारांचा माग काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ते सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत होते. रचकोंडा पोलिस आयुक्त डी.एस. चौहान यांनी घटनास्थळी आणि मीरपेट पोलिस स्टेशनला भेट दिली. याप्रकरणी मीरपेठ पोलीस चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. प्राथमिक माहिती अशी की, आरोपींनी गांजा ओढला होता. त्या नशेत त्यांनी हे कृत्य केले.
ट्विट
#Hyderabad: A 16-year-old girl was gang-raped by three men at her house, sources said.
The police registered a case and sent the victim to Sakhi centre for medical examination. pic.twitter.com/31KljCnndA
— IANS (@ians_india) August 22, 2023
पीडित दलित मुलगी दिलसुखनगर येथील एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे, तर तिचा लहान भाऊ फ्लेक्स लावण्याचे काम करतो. पीडितेच्या आईवडीलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर पीडिता आपले भाऊ आणि कुटुंबीयांसाह कॉलनीत स्थलांतरित झाले होते आणि एका नातेवाईकाकडे राहत होते.