Elon Musk Welcomes His 12th Child: अब्जाधीश एलोन मस्क झाले 12 व्या बाळाचे वडील; न्यूरालिंक कर्मचारी Shivon Zilis सोबत तिसरे अपत्य
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 19 जून 2024 रोजी एलोन मस्कची एकूण संपत्ती $210 अब्ज झाली आहे. हे जगातील सर्वोच्च आहे.
Elon Musk Welcomes His 12th Child: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलोन मस्क हे आपल्या 12 व्या अपत्याचे वडील झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, एलोन मस्क आणि न्यूरालिंक कार्यकारी शिवोन झिलिस यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचे स्वागत केले. दोघेही आधीच जुळ्या मुलांचे पालक आहेत. याआधी एलोन मस्क म्हणाले होते की, जग कमी लोकसंख्येच्या संकटाचा सामना करत आहे आणि उच्च बुद्धिमत्ता असलेल्या लोकांनी अधिक पुनरुत्पादन केले पाहिजे. झिलिस म्हणाल्या होत्या की, मस्क यांनी त्यांना मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित केले आणि नंतर स्पर्म डोनर बनण्याची ऑफर दिली. मस्कच्या 8 मुलांपैकी 5 ही त्यांची पहिली पत्नी लेखिका जस्टिन मस्क आणि तीन संगीतकार ग्रिम्ससोबत आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 19 जून 2024 रोजी एलोन मस्कची एकूण संपत्ती $210 अब्ज झाली आहे. हे जगातील सर्वोच्च आहे. मस्कची संपत्ती ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यापेक्षा तीन अब्ज डॉलर्स जास्त आहे. (हेही वाचा: Epilepsy Device: जगात प्रथमच एपिलेप्सी नियंत्रित करण्यासाठी रुग्णाच्या कवटीत बसवले यंत्र; झटके 80 टक्क्यांनी झाले कमी- Reports)
पहा पोस्ट-
#ElonMusk reportedly welcomed his youngest child earlier this year. Despite keeping matter private, the #billionaire refuted secrecy around the baby's birth.
Read more: https://t.co/5IQ1zTd3SB pic.twitter.com/6DKpj7r2QZ
— Hindustan Times (@htTweets) June 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2024 06:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

