कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau आणि पत्नी Sophie लग्नाच्या 18 वर्षानंतर होणार वेगळे; सोशल मिडियाद्वारे दिली विभक्त झाल्याची माहिती
48 वर्षीय सोफी ग्रेगोइर ट्रूडो क्यूबेकमध्ये टेलिव्हिजन रिपोर्टर देखील आहेत. त्यांनी 51 वर्षीय जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत तीन निवडणुकांसाठी प्रचारही केला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 18 वर्षांनंतर पत्नी सोफीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. जस्टिन ट्रूडो यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये घोषणा केली की, ते आणि त्यांची पत्नी सोफी ग्रेगोयर ट्रूडो वेगळे होत आहेत. जस्टिन ट्रूडो आणि सोफी यांनी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी दीर्घ चर्चेनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात दोघांनी कायदेशीर विभक्ततेच्या करारावर स्वाक्षरी केल्याचे म्हटले आहे.
दोघांनी 2005 मध्ये लग्न केले होते. 48 वर्षीय सोफी ग्रेगोइर ट्रूडो क्यूबेकमध्ये टेलिव्हिजन रिपोर्टर देखील आहेत. त्यांनी 51 वर्षीय जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत तीन निवडणुकांसाठी प्रचारही केला आहे. महिलांच्या हक्कांसाठी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी त्या अनेकदा वकिली करताना दिसल्या आहेत. त्याच वेळी, जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यालयाने त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. पदावर असताना वेगळे होण्याची घोषणा करणारे ट्रूडो हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी त्यांचे वडील पियरे ट्रूडो हे 1979 मध्ये पत्नी मार्गारेटपासून वेगळे झाले होते आणि 19८४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. (हेही वाचा: Chinese Woman in Pakistan: प्रेमात सीमा नसतात, अंजू नंतर आता चिनी तरुणीचा पराक्रम; चिनी तरुणींने प्रेमासाठी गाठलं पाकिस्तान)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)