Baby Born With 4-Inch Tail: चीनमध्ये जन्माला आले 4 इंच लांब शेपटी असलेले बाळ; पालकांना बसला धक्का, डॉक्टरांच्या मते अत्यंत दुर्मिळ घटना
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे आणि हे एका विशेष स्थितीमुळे घडते. मेट्रोच्या रिपोर्टनुसार या मुलाचा जन्म हांगझोऊ चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये झाला आहे.
Baby Born With 4-Inch Tail: पूर्वी मानवालाही माकडांप्रमाणे शेपटी (Tail) असायची मात्र अलीकडेच चीनमध्ये (China) 4 इंच लांब शेपटी असलेल्या बाळाचा जन्म झाला, जो पाहून पालकांना धक्काच बसला. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे आणि हे एका विशेष स्थितीमुळे घडते. मेट्रोच्या रिपोर्टनुसार या मुलाचा जन्म हांगझोऊ चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये झाला आहे. न्यूरोसर्जन डॉ. ली यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले- शेपटी असलेल्या मुलाचा जन्म हा असामान्य वाढीचा परिणाम आहे. जेव्हा काही अवयव खूप वेगाने विकसित होतात आणि प्रक्रिया थांबवता येत नाही तेव्हा असे घडते. जेव्हा पाठीचा कणा आसपासच्या ऊतकांशी असामान्यपणे जोडलेला असतो तेव्हा अशी शेपटी बाहेर येते. (हेही वाचा: Viral Video: मेट्रोच्या दरवाज्यात अडकला बेबी स्ट्रोलर, पाहा पुढे नेमकं काय घडलं)