Zoom Layoffs: 1300 कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर कंपनी आणखी एक मोठी घोषणा, अध्यक्ष ग्रेग टॉम्ब यांची हकालपट्टी
ग्रेग टॉम्ब्स यांना काही कारण ने देता पदावरुन काढत असल्याची घोषणा केली आहे.
व्हिडिओ कम्युनिकेशन क्षेत्रातील दिग्गज झूम (Zoom) कंपनीची संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. झूमचे सीईओ एरिक युआन (CEO Eric Yuan) यांनी गेल्या महिन्यात कंपनीतून 1,300 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. पण यावेळी कंपनीने अचानक आपले अध्यक्ष ग्रेग टॉम्ब (Zoom President Greg Tomb) यांना काढून टाकले आहे. झूमने रेगुलेटरी फाइलिंगमध्ये त्याचे अध्यक्ष ग्रेग टॉम्ब्स यांना काही कारण ने देता पदावरुन काढत असल्याची घोषणा केली आहे. या पदासाठी ग्रेग टॉम्ब यांची निवड जून २०२२ मध्येच झाली होती. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या अचानक निर्णयामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)