Two WhatsApp Accounts on Same Device: आता एकाच फोनमध्ये वापरू शकणार दोन व्हॉट्सअॅप खाती; Mark Zuckerberg ची नव्या फिचरची घोषणा

एकाच अॅपमध्ये दुसरे खाते तयार करण्यासाठी, तुम्हाला दुसरा फोन नंबर आणि सिम कार्ड किंवा मल्टी-सिम किंवा eSIM स्वीकारणारा फोन आवश्यक आहे.

WhatsApp (PC- Pixabay)

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच एकाच अॅपमध्ये दोन व्हॉट्सअॅप अकाउंट वापरणे शक्य होणार आहे. मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपने गुरुवारी एकाच वेळी 2 व्हॉट्सअॅप खात्यांवर लॉग इन करण्याची सुविधा जाहीर केली. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप वापरकर्ते लवकरच एकाच वेळी 2 व्हॉट्सअॅप अकाउंट्समध्ये लॉग इन करू शकतात. ये फिचर येत्या काही महिन्यांत Android वापरकर्त्यांसाठी रोलआउट सुरू होईल.

कंपनीने म्हटले आहे की, ‘आता तुम्हाला प्रत्येक वेळी लॉग आउट करण्याची किंवा 2 फोन वापरण्याची गरज नाही.’ एकाच अॅपमध्ये दुसरे खाते तयार करण्यासाठी, तुम्हाला दुसरा फोन नंबर आणि सिम कार्ड किंवा मल्टी-सिम किंवा eSIM स्वीकारणारा फोन आवश्यक आहे. WhatsApp सेटिंग्ज मध्ये जाऊन तुम्ही Add Account” वर क्लिक करून तुम्ही दिसारे खाते सुरु करू शकता. कंपनीच्या मते, तुम्ही प्रत्येक खात्यावर तुमची गोपनीयता आणि सूचना सेटिंग्ज नियंत्रित करू शकता. मेटा-मालकीच्या प्लॅटफॉर्मने वापरकर्त्यांना फक्त अधिकृत व्हॉट्सअॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: X Won't Be Free Anymore: इलॉन मस्क आता प्रत्येक नवीन वापरकर्त्यांकडून एक डॉलर शुल्क आकारण्याची शक्यता, अहवालातून खुलासा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)