IPL Auction 2025 Live

Lunar Eclipse 2022 Photos: आज दिसले वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; पहा जगातील विविध भागांतील चंद्राचे काही खास फोटो (See)

चंद्रग्रहण ही भौगोलिक घटना असली तरी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा राहू आणि केतू चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चंद्रावर ग्रहण होते अशी पौराणिक मान्यता आहे.

Lunar Eclipse 2022 Photos

वर्ष 2022 मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी लागले. या दिवशी कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली साजरी केली जाईल.चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तासांचा असतो व तो ग्रहणाच्या आधी सुरू होतो. चंद्रग्रहण ही भौगोलिक घटना असली तरी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा राहू आणि केतू चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चंद्रावर ग्रहण होते अशी पौराणिक मान्यता आहे. अशा स्थितीत या संकटाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आज संध्याकाळी 6.18 वाजता ग्रहण कालावधी समाप्त होत आहे. सध्या सोशल मिडियावर जगातील विविध भागांमधील ग्रहणाचे फोटोज व्हायरल झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)