Meta's Big Action in India: भारतामध्ये मेटाची मोठी कारवाई; नोव्हेंबर 2023 मध्ये Facebook, Instagram वरील 23 दशलक्षाहून अधिक खराब कंटेंट काढून टाकला
इंस्टाग्रामवर, कंपनीला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 11,138 अहवाल प्राप्त झाले. यापैकी, कंपनीने वापरकर्त्यांना 4,209 प्रकरणांमध्ये त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली.
मेटाने (Meta) नोव्हेंबर 2023 मध्ये भारतामध्ये मोठी कारवाई केली आहे. मेटा म्हटले आहे की, नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात फेसबुकच्या 13 पॉलिसींमधील 18.3 दशलक्ष कंटेंट आणि इंस्टाग्रामसाठी 12 पॉलिसींमधील 4.7 दशलक्ष कंटेंटचे तुकडे काढून टाकले. 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान फेसबुकला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 21,149 अहवाल प्राप्त झाले आणि त्यांनी 10,710 प्रकरणांमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली. इतर 10,739 अहवालांपैकी जेथे विशेष रिव्ह्यूची आवश्यकता होती, तिथे कंपनीच्या धोरणांनुसार कंटेंट रिव्ह्यू केले गेले आणि एकूण 4,538 अहवालांवर कारवाई केली. उर्वरित 6,201 अहवालांमध्येही रिव्ह्यू झाले परंतु कदाचित कारवाई केली गेली नाही.
दुसरीकडे, इंस्टाग्रामवर, कंपनीला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 11,138 अहवाल प्राप्त झाले. यापैकी, कंपनीने वापरकर्त्यांना 4,209 प्रकरणांमध्ये त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली. इतर 6,929 अहवालांपैकी जेथे विशेष रिव्ह्यूची आवश्यकता होती, तिथे मेटाने कंटेंट रिव्ह्यू केला आणि एकूण 4,107 अहवालांवर कारवाई केली. उर्वरित 2,822 अहवाल रिव्ह्यू केले गेले, परंतु कदाचित कार्यवाही केली गेली नाही. (हेही वाचा: Instagram New Features: इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास फिचर, स्टोरीवर प्रोफाइल शेअर करण्याचा मिळणार पर्याय)
#Meta purged over 23 mn bad pieces of content on FB, Insta in India in Nov 2023
Read: https://t.co/GQR7hbq9G1 pic.twitter.com/YDnIsvZulM
— IANS (@ians_india) January 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2024 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

