IND-W Vs AUS-W: रिचा घोषच्या शानदार गेम अवेरनेसने बेथ मुनी झाली धावबाद; पाहा ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद होण्याचा व्हिडिओ
भारतीय फलंदाज रिचा घोषने गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून एकही चूक केलेली नाही.
भारतीय फलंदाज रिचा घोषने गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून एकही चूक केलेली नाही. 20 वर्षीय रिचाने 21 डिसेंबरपासून सुरू झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीसह क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये प्रवेश केला आहे. पदार्पणाच्या कसोटीत शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर, तीने क्षेत्ररक्षणातही आपले उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मन जिंकले.
शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावात रिशाने ऑस्ट्रेलियाची स्टार सलामीवीर बेथ मुनीला एका शानदार थ्रोच्या मदतीने धावबाद केले. 12व्या षटकात स्नेह राणाच्या पाचव्या चेंडूवर बेथ मुनीने कोणताही विचार न करता पुढे जाऊन एक साधा बचावात्मक शॉट खेळला. सिली पॉइंटवर उभ्या असलेल्या रिचाच्या हातात चेंडू थेट गेला. तीने तो सरळ यष्टीवर मारत बाद केले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)