Pakistan vs Afghanistan Live Score, World Cup 2023: पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, दोन्ही संघांचे प्लेइंग पहा

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 22व्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना चेन्नईत चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने 4 सामन्यात 2 जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानने 4 पैकी 1 सामना जिंकला आहे. चेपॉकमध्ये फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. बंगळुरूमध्ये पाकिस्तानचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाकडून हरला होता. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)