Bajrang Punia Returns Padmashri Award: कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना केला परत, पत्र लिहून केली घोषणा

कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट केले - मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे...." बजरंगने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ही घोषणा केली आहे.

Bajrang Punia Returns Padmashri Award: कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही, असे दिग्गज कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी सांगितले. तसेच, संजय सिंगच्या निवडीचा निषेध करत साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट केले - मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे...." बजरंगने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ही घोषणा केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement