Daryl Mitchell Half Century: रचिन रवींद्रनंतर डॅरिल मिशेलने झळकावले अर्धशतक, न्यूझिलंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

सध्या 31 षटकानंतर न्युझीलंडची 160 वर 2 बाद अशी धावसंख्या असून रचिन आणि डॅरिल दोघेही 68 धावांवर खेळत आहे.

ICC ODI विश्वचषक 2023 चा 21 वा सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात धर्मशाला येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. न्यूझीलंडनेही चारही सामने जिंकून सर्व जिंकले आहेत. आता दोन्ही संघ एकमेकांशी टक्कर देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्या या सामन्यात खेळत नाहीये. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाल्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरिल मिशेलने चांगला डाव संभाळला. दोघांनी आपले अर्धशतक झळकावले आहे. सध्या 31 षटकानंतर न्युझीलंडची 160 वर 2 बाद अशी धावसंख्या असून रचिन आणि डॅरिल दोघेही 68 धावांवर खेळत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif